शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्ग आयोगावरच घेतला आक्षेप!

By admin | Updated: April 28, 2017 03:36 IST

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मागासवर्ग आयोगाविरुद्धच उच्च न्यायालयात अन्य एक जनहित याचिका दाखल करण्यात

मुंबई : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मागासवर्ग आयोगाविरुद्धच उच्च न्यायालयात अन्य एक जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती एका याचिकाकर्त्याने गुरुवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाला दिली. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष ‘मराठा क्रांती मोर्चा’चे सदस्य असल्याची माहितीही या वेळी उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्यावर उच्च न्यायालयाने यावर आपण नंतर निर्णय घेऊ, असे म्हणत मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी ३ मे रोजी ठेवली.मराठा व मुस्लीम समाजाला अनुक्रमे १६ टक्के व ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या. तर राज्य सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थही अनेक याचिका दाखल आहेत. त्यावर गुरुवारी सुनावणी होती.मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी सरकारने जिल्हा पातळीवर माहिती जमा केली आहे. त्याची छाननी आणि विश्लेषणासाठभ् सर्व याचिका काही महिन्यांपूर्वीच नियुक्त करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाकडे वर्ग करण्याचे काही याचिकाकर्त्यांनी सूचवले. परंतु, काही याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे उच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.दरम्यान, राज्य सरकारने सरकारी कार्यालयांत तात्पुरत्या स्वरूपी भरलेल्या १६ टक्के पदांचा कालावधी संपत आल्याने तर काहींचा कालावधी संपल्याने नव नियुक्तीसाठी किंवा पुनर्नियुक्तीसाठी अर्ज केला होता. या अर्जावरही न्यायालयाने सर्वांना उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. मात्र गुरुवारी कोणीही उत्तर न दिल्याने ३ मे रोजी निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)