शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे कंत्राट बचत गटांना

By admin | Updated: April 21, 2017 03:16 IST

राज्यातील हजारो अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम येत्या १ मेपासून नवीन महिला बचत गटांना देण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई : राज्यातील हजारो अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम येत्या १ मेपासून नवीन महिला बचत गटांना देण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या कंत्राटावरून महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना टीकेचे लक्ष्य बनविण्यात आले होते. तथापि, मुंडे यांच्या विभागाने घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. हा पोषण आहार अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरानेच तयार करावा, असा आदेश २०११मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. त्यानुसार विभागाने २०१६मध्ये निविदा प्रक्रिया राबविली. त्याला काही महिला बचत गटांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. विभागाने राबविलेली निविदा प्रक्रिया योग्य ठरवितानाच उच्च न्यायालयाने ज्या बचत गटांनी निविदा भरलेल्या आहेत त्यांच्या युनिट्सची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयीन निर्णयामध्ये अधिक सुस्पष्टता यावी यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २०१६मध्ये राबविलेली निविदा प्रक्रिया योग्य ठरवावी, अशी विनंती राज्य शासनाने केली होती.त्यावर न्या. दीपक मिश्रा, अजय खानविलकर आणि न्या. मोहन एम. शांतनगुदूर यांच्या खंडपीठाने ज्या जिल्ह्यांमध्ये पोषण आहार पुरविण्याचा बचत गटांचा विहित कालावधी संपला आहे त्या जिल्ह्यांमध्ये १ मेपासून २०१६मध्ये राबविलेल्या निविदा प्रक्रियेनुसार नवीन महिला बचत गटांना पुरवठ्याचे कंत्राट द्यावे, असा अंतरिम आदेश बुधवारी दिला. या निर्णयामुळे या जिल्ह्यांमधील सध्याच्या १५१ गटांचे पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट आता संपुष्टात येणार असून, नवीन १८ बचत गटांना काम मिळेल. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने अ‍ॅड. विराज कदम यांनी बाजू मांडली. (विशेष प्रतिनिधी)