शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अतिवेगाने वाढतेय श्रीमंतांची संख्या

By admin | Updated: March 3, 2017 06:10 IST

पुण्यातील श्रीमंतांची संख्या देशात सर्वाधिक १८ टक्क्यांनी वाढत असल्याचे ११ व्या संपत्ती अहवालात म्हटले आहे.

पुणे : पुण्यातील श्रीमंतांची संख्या देशात सर्वाधिक १८ टक्क्यांनी वाढत असल्याचे ११ व्या संपत्ती अहवालात म्हटले आहे. ज्यांची संपत्ती ३0 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे, अशा श्रीमंतांची पुण्यातील संख्या येत्या दशकात १७0 टक्क्यांनी वाढणार आहे.अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिविज्युअल (यूएचएनडब्ल्यूआय) म्हणजे अतिश्रीमंतांची माहिती ठेवणाऱ्या नाइट फ्रँक या संस्थेने हा अहवाल जारी केला आहे. ८९ देशांतील १२५ शहरांतील श्रीमंतांची माहिती अहवालात आहे. जगातील ९00 मोठ्या खासगी बँका आणि संपत्ती सल्लागाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार सध्या पुण्यात १४0 अतिश्रीमंत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संख्या १८ टक्क्यांनी वाढली आहे. येत्या दहा वर्षांत पुण्यातील श्रीमंतांची संख्या वाढतच राहणार आहे.नाइट फ्रँकचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि राष्ट्रीय संचालक डॉ. समंतक दास यांनी सांगितले की, पुण्याचे आता टेक्नॉलॉजी हबमध्ये वेगाने रूपांतर होत आहे. तसेच ते मुंबईपासून जवळ आहे. अनेक श्रीमंत व्यक्ती मुंबईऐवजी पुण्यात राहणे पसंत करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मुंबई जगात २१ व्या स्थानीअहवालातील माहितीनुसार, यंदा पुण्यात २१ अतिश्रीमंतांची भर पडली. भारतात दरवर्षी ५00 लोक या यादीत नव्याने समाविष्ट होतात. येत्या काही वर्षांत हा आकडा १ हजारवर जाईल. या यादीत टोरँटो, वॉशिंग्टन डीसी आणि मॉस्कोच्या पुढे असलेली मुंबई २१ व्या स्थानी आहे. बँकॉक, सिएटल आणि जकार्ता यांच्या पुढे असलेली दिल्ली ३५ व्या स्थानी आहे.>30 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या नागरिकांच्या जागतिक यादीत ६,३४0 लोक नव्याने दाखल झाले. 193490 लोक या यादीत आहेत. एक अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या लोकांची संख्या २,0२४ झाली आहे.क्रेडाईचे उपाध्यक्ष सतीश मगर यांनी सांगितले की, वस्तू उत्पादन, कृषी, शिक्षण, कोअर इंजिनीअरिंग, आणि आयटी यासारख्या अनेकविध पातळ्यांवर विकास झाल्यामुळे पुणे पुढे आले