शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोर अभयारण्यातील वाघांची संख्या घटली

By admin | Updated: October 24, 2014 03:52 IST

वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच वाघांसाठी राखीव, म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच वाघांसाठी राखीव, म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या सात वर्षांपासून सतत खालावत असल्याचे भीषण वास्तव उजेडात आले आहे़ सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारांतर्गत याबाबतची माहिती मागवली होती़ त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे. वन विभागाच्या माहितीनुसार गत २००७ मध्ये बोर व न्यू बोर अभयारण्यात एकूण सहा वाघांचा अधिवास होता. यानंतर २००८ ते २०११ दरम्यान येथील वाघांची प्रगणना होऊ शकली नाही. त्यामुळे या काळातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. परंतु २०१२ मध्ये झालेल्या प्रगणेत येथील वाघांची संख्या सहावरून पाच झाली आहे. शिवाय २०१४ मध्ये ती पुन्हा खाली घसरून, आता केवळ चार वाघ येथे शिल्लक राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचवेळी वन्यजीव विभाग मात्र मागील दोन वर्षांत बोर व न्यू बोर अभयारण्यात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा ढिंडोरा पिटून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. जर या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासंबंधी एवढी विकास कामे झाली, तर वाघांची संख्या कमी का होत आहे? असा वन्यजीवप्रेमी संघटनांतर्फे सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे नागपूरशेजारच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या संख्येत वाढ होऊन, सध्या येथे एकूण चार वाघांचा अधिवास असल्याचे वन्यजीव विभाग सांगत आहे.गत २००७ च्या प्रगणनेनुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एकही वाघ नव्हता. परंतु २०१३ मध्ये येथील वाघांची संख्या तीनवर पोहोचली आणि २०१४ मध्ये त्यात पुन्हा एका वाघाची भर पडून ती चार झाली आहे. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण २३ वाघ असल्याचा दावा करण्यात आला आहे.यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल आठ वाघांची भर पडली आहे. २०१३ मध्ये येथे एकूण १५ वाघ होते. परंतु आता ती संख्या २३ वर पोहोचली असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)