शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची संख्या ६ हजारवरून १२०० वर

By admin | Updated: June 19, 2017 02:47 IST

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली, त्या-त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे टँकरमुक्ती झाल्याचे दिसले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ज्या-ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली, त्या-त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे टँकरमुक्ती झाल्याचे दिसले. गेल्या वर्षी मे महिन्यात जवळपास ६ हजार २०० टँकरसुरू होते. यंदा त्यांची संख्या बाराशेपर्यंत खाली आली. राज्यात आतापर्यंत १ हजार १९० गावे टँकरमुक्त झाली असून, साधारण ५ हजार गावे टँकरमुक्तीच्या मार्गावर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या काय्रक्रमांतर्गत ‘पाणी’ या विषयावरील कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री बोलत होते. लातुरला मागच्या वेळी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता, पण नंतर तिथे लोकसहभागातून जलयुक्त शिवारची चांगली कामे झाली आणि अनेक गावे टँकरमुक्त होऊ शकली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून योजना तयार करण्यात आली असून साधारण ४१ हजार स्रोतांच्या बळकटीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागांत समन्वय निर्माण करून, राज्य कायमचे टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात सर्वच प्रकल्पांना थोडा-थोडा निधी देऊन सगळेच प्रकल्प अर्धवट ठेवण्यात आले होते. आता त्यातील जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांना प्राधान्याने निधी देऊन ते पूर्ण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. २०१९पर्यंत प्रकल्प मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाला जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, ९०० कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.