शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ फार्मची एसीबीकडून मोजदाद

By admin | Updated: August 23, 2016 05:34 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या सिडकोतील भुजबळ फार्मच्या क्षेत्रफळाची मोजणी तसेच मालमत्तेचे सोमवारी मूल्यांकन करण्यात आले.

नाशिक : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या सिडकोतील भुजबळ फार्मच्या क्षेत्रफळाची मोजणी तसेच मालमत्तेचे सोमवारी मूल्यांकन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील मुंबईच्या अधिकाऱ्यांनी फार्म ताब्यात घेत मूल्यांकनास सुरुवात केली होती.बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल तीन गुन्ह्यांप्रकरणी भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक झाली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक भुजबळ फार्मवर दाखल झाले. तपास अधिकाऱ्यांनी फार्म परिसर व आलिशान बंगल्याची मोजदाद केली. अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत माध्यमांना कुठलीही माहिती दिली नाही. तब्बल दोन ते अडीच तास भुजबळ यांच्या मालमत्तेची मोजदाद सुरू होती. फार्मचे प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले होते. भुजबळ यांचे नवीन व जुन्या निवासस्थानाच्या एकूण क्षेत्राची मोजणी केली. (प्रतिनिधी) >८७० कोटींच्या घोटाळ्याचा आरोपदिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम कंत्राटात अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठातील भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ, मुंबई-नाशिक टोलरोड आदी नऊ प्रकल्पांमध्ये नातेवाइकांना कंत्राट देऊन सुमारे ८७० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भुजबळांवर आहे.>छगन भुजबळ यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून एसीबी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळ फार्म व परिसराची मोजदाद केली. उपरोक्त कारवाईमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश नव्हता. तपासासाठी अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. बंगला जप्त केल्याची अफवा आहे. - अ‍ॅड. जालिंदर ताडगे, भुजबळ यांचे वकील