शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव स्फोटातील मृतांची संख्या अठरा

By admin | Updated: June 2, 2016 03:18 IST

पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन जवानांचे मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या १८ झाली आहे.

वर्धा/नागपूर : पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन जवानांचे मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या १८ झाली आहे. घटनास्थळ पसिरातील काही इमारती उद्ध्वस्त झाल्याने मलब्याखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीमागील नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात असून, नुकसानीबाबतचा अंदाजही लष्कर प्रशासनाने व्यक्त केलेला नाही. बुधवारी सायंकाळपासून शहिदांचे मृतदेह तिरंग्यात गुंडाळून व पुष्पचक्र अर्पण करून दारूगोळा भांडाराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढायला सुरुवात झाली. सात जणांची ओळख अद्यापही पटलेली नाही. जखमी झालेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांसह सर्व १७ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्राने दिली. यातील डेफ्टी कमांडंट जगदीश चंद्रा, शरद यादव, गजेंद्र सिंह या अधिकाऱ्यांना दुपारी हेलिकॉप्टरने पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले. स्फोटाच्या आवाजाने सात जणांच्या कानाचे पडदे फाटले असून, त्यांना बधिरता आली आहे. सेवाग्राम व सामान्य रुग्णालयाच्या चमूने घटनास्थळावरच १८ मृतदेहांचे शवविच्छेदन केले. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. पुलगाव शोकमग्नया भीषण दुर्घटनेमुळे पुलगावात शोकमग्न वातावरण होते. शहिद जवानांच्या नातेवाईकांसह शहरातील नागरिकांनी दारूगोळा भांडाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकच गर्दी केली होती, तर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शहिदांना आदरांजली अर्पण केली. शहरात ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण करणारे फलक शहर शोकसागरात बुडाल्याचा प्रत्यय देत होते..............................‘ती’ गावे बारुदच्या ढिगाऱ्यावर केंद्रीय दारूगोळा भांडारात वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे परिसरातील गावांमध्ये भीती आहे. आतापर्यंत स्फोटाच्या चार घटना घडल्या आहेत. उन्हाळा आला की ही मंडळी मूठीत जीव घेऊन असतात. बॉम्ब स्फोट झाल्यानंतर हवेत उडालेले लोखंडी तुकडे परिसरातील ५ कि.मी. परिघात असलेल्या गावांमध्ये जावून पडत असल्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. या घटनांममुळे आम्ही बारुदच्या ढिगाऱ्यावर जीव मूठीत घेऊन राहतो, अशी भीती सदर गावकऱ्यांनी व्यक्त केली..................मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदतपुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग लागून झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास दिले असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ......................दारुगोळ भांडाराच्या सेफ्टी आॅडिटचा आदेशश्रीनगर : जम्मू-काश्मिरातील लष्कराच्या सर्व दारुगोळा भांडाराचे सुरक्षेच्या दृष्टीने आॅडिट करण्याचा आदेश विधानसभाध्यक्ष कविंदर गुप्ता यांनी बुधवारी राज्य सरकारला दिला आहे. पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला आग लागून १८ जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारला खबरदारी घेण्याचा सल्ला दिला.