शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानग्यांची संख्या आता निम्म्यावर

By admin | Updated: January 3, 2016 04:49 IST

मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम विषयक विविध परवानग्या व संबंधित कार्यपद्धती व प्रमाणपत्रांचे सुलभीकरण करण्यात आले असून, आता परवानग्यांची संख्या ११९वरून ५८

- मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम विषयक विविध परवानग्या व संबंधित कार्यपद्धती व प्रमाणपत्रांचे सुलभीकरण करण्यात आले असून, आता परवानग्यांची संख्या ११९वरून ५८ करण्यात आली आहे. ६१ परवाने रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लायसन्स राज कमी करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे इमारत बांधकाम विषयक प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम परवानग्यांबाबत तयार केलेली सुधारित कार्यपद्धती सर्वांसाठी उपयुक्त असून, राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका यांनीदेखील मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर अशाच प्रकारची कार्यपद्धती निश्चित करून ही सर्व माहिती ई-प्लॅटफॉर्मवर आणण्याचे निर्देशही या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.लायसन्स राज कमी करण्याची गरज असल्याचा लेख शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केला होता. त्या पार्श्वभूमीवर, ६१ परवाने रद्द करत मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुधारित इमारत प्रस्ताव मंजुरी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महापालिका आयुक्त अजय मेहता आदी या वेळी उपस्थित होते. मुंबईत इमारत बांधकामासाठीच्या परवानग्या समांतर पद्धतीने राबविण्यात येणार असल्याने लागणारा कालावधी केवळ ६० दिवसांवर येणे अपेक्षित आहे. यामुळे घरांच्या किमतीही कमी होऊन सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर या सर्व प्रकिया आॅनलाइन झाल्यानंतर या प्रक्रियेचे १५ ते २० दिवसांनी सातत्याने मूल्यमापन करणे गरजेचे असल्याचे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. या सर्व परवानग्या वेळेत दिल्या तर परवडणारी घरे वेळेत देणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)काय आहेत वैशिष्ट्ये- चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) सवलत विषयक प्रस्ताव असल्यास त्याबाबतची प्रक्रिया कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर सुरू होणार आहे. यामुळे साहजिकच छाननी प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होईल.- इमारतीसंदर्भात शुल्क इत्यादींचा भरणा करण्यासाठी यापूर्वी विविध स्तरावर ८९ टप्पे होते, त्याचप्रमाणे हा भरणा विविध ठिकाणी करावा लागत असे. आता एक खिडकी पद्धत असेल.- इमारत बांधकामादरम्यान इमारतीची अंतर्गत मलनि:सारण व्यवस्था, अंतर्गत नळ जोडण्या, अंतर्गत विद्युत व्यवस्था तसेच इतर तांत्रिक व्यवस्था आदींबाबतीत संबंधित अधिकृत बाह्यसेवा पुरवठादाराचे / सल्लागारांचे स्वयं प्रमाणपत्र पद्धती आता स्वीकारण्यात आली आहे. - नवीन इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र व इमारत पूर्णत्वाचा दाखला यापूर्वी स्वतंत्रपणे दिले जात होते, ते आता एकाचवेळी दिले जाणे शक्य होणार आहे.- इमारत बांधकाम प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले असून आता संबंधित प्रस्तावाची छाननी सहायक अभियंता स्तरावर पूर्ण करण्यात येणार आहे.