शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

अणुऊर्जा देशाला स्वावलंबी करेल!

By admin | Updated: March 14, 2015 02:01 IST

औष्णिक, जल आणि पवनऊर्जेच्या निर्मितीला नैसर्गिक मर्यादा आहेत. ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात प्रयत्नांची गरज असून, देशाला स्वावलंबी करायचे असेल

यवतमाळ : औष्णिक, जल आणि पवनऊर्जेच्या निर्मितीला नैसर्गिक मर्यादा आहेत. ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात प्रयत्नांची गरज असून, देशाला स्वावलंबी करायचे असेल तर अणुऊर्जाच त्याला पर्याय ठरू शकतो, असे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे सचिव डॉ. आर.के. सिन्हा यांनी शुक्रवारी येथे केले.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित ‘एनर्जी फॉर टुमारो’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँ सरस्वती आणि जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायन टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.एस. सपकाळ, एनआयटी वारंगलचे डॉ. एस.एच. सोनोवने, संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. सिन्हा म्हणाले, देशात ऊर्जा क्षेत्रात विकासाची मोठी संधी आहे. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढते तापमान व पर्यावरणाचा धोका आम्हाला लक्षात घ्यावा लागेल. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विकासात पुढे जावे लागेल. यवतमाळ येथे व्याख्यानासाठी खासदार विजय दर्डा यांनी १० महिन्यांपूर्वीच निमंत्रण दिले होते. त्या वेळी यवतमाळ प्रवासाबद्दल माहिती घेतली असता तेथे रेल्वेने जावे लागेल, असे सांगण्यात आले. तेव्हा दोन दिवस एक रात्र व्यर्थ जाईल का, असा विचार मनात आला. मात्र यवतमाळात आलो आणि मन प्रसन्न झाले. येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर नतमस्तक होताना मनाला विशेष शांती मिळाली. प्रेरणास्थळ हे शो-पीस अथवा पर्यटनस्थळ नाही, तर खरोखरच प्रेरणा देणारे स्थळ होय. ज्या लोकांनी देशासाठी आपले सर्वस्व दिले त्या महान व्यक्तींचे नाव आजही आम्ही घेतो. त्यातीलच जवाहरलालजी दर्डा एक आहेत. या परिसराच्या विकासासाठी त्यांनी जे कार्य केले ते अतुलनीय असल्याचे डॉ. सिन्हा म्हणाले. देशातील अणुऊर्जेच्या विकासाची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी डॉ. होमी भाभा यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. खासदार विजय दर्डा म्हणाले, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, विजय भटकर, होमी भाभा, रघुनाथ माशेलकर आदी मंडळी सामान्य कुटुंबातच जन्माला आली. आपल्या संघर्षातून त्यांनी देशासाठी महान कार्य केले. मात्र आजच्या तरुणांतील संघर्ष करण्याची इच्छाशक्ती संपत चालली आहे. संघर्षातूनच सर्वोच्च स्थानी पोहोचता येऊ शकते, यासाठी तरुणांनी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.या वेळी डॉ. व्ही.एस. सपकाळ, प्रा.डॉ. एस.एच. सोनोवने यांनीही विचार व्यक्त केले. डॉ. आर.के. सिन्हा यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले़ (नगर प्रतिनिधी)