शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्रमृत्यूंच्या चौकशीचे ‘एनटीसीए’चे आदेश

By admin | Updated: July 28, 2016 01:00 IST

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी

- गणेश वासनिक, अमरावती

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाने (एनटीसीए) व्याघ्र प्रकल्पांंना दिले आहेत.वाघांची शिकार करून सीमेपार तस्करी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी एनटीसीएने सूक्ष्म परीक्षण करण्याचे ठरविले आहे. यात व्याघ्रमृत्यूचा व्हिसेरा अहवाल, तपास आणि गुप्तवार्ता मिळविण्याच्या कामात बहुशाखीय दृष्टिकोन ठेवून, शिकाऱ्यांना जेरबंद करणे, गुप्तवार्ता, गुप्तचर विभाग आणि एसआययू या एजन्सीमध्ये सहकार्य ठेवण्यासाठी प्रयत्न आदींवर भर दिला जाणार आहे.प्रयोगशाळेची उणीववाघांचे मृत्यू, शिकार झाल्यानंतर, त्यांचे अवयव, कातडीची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व्याघ्र प्रकल्पांकडे नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडताना वाघांचे अवयव मिळणे आवश्यक असते. मात्र, अवयवांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याने, याचा फायदा आरोपींना होत असल्याचे वास्तव आहे. प्रयोशशाळा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.वाघांच्या मृत्यूबाबत ‘एनटीसीए’ने समिती गठित केली आहे. ही समिती वाघांच्या मृत्यूची कारणे शोधून केंद्र सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करेल. मेळघाटात वाघांच्या मृत्यूंची एनटीसीएचे नागपूर, बेंगळूरचे आयजी, तर दिल्ली येथील डीआयजी चौकशी करतील. तसे पत्रदेखील प्राप्त झाले आहे.’- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.