शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

महाराष्ट्रात ‘एनआरसी’, ‘सीएए’ लागू करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 05:42 IST

जोरदार घोषणाबाजी : विविध मुस्लीम संघटनांचा विधिमंडळावर मोर्चा

नागपूर : भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. केंद्र सरकारने संसदेत एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे पारित करून अख्ख्या देशात हिंसात्मक वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात हे कायदे लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले.मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे व केंद्र सरकारने एनआरसी व सीएए लादलेले हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी भव्य मोर्चा विधिमंडळावर आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लीम महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणात समावेश होता. हजारोच्या संघटने मुस्लीमबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सांगलीत निदर्शने, सोलापुरात मानवी साखळी, साताऱ्यात मोर्चानागरिकत्व सुधारणा कायद्याला तीव्र विरोध करत कायदा विरोधी कृती समितीच्यावतीने गुरुवारी साताºयात मूक मोर्चा काढला. सांगलीत भाकप, आयटकने निदर्शने केली तर कोल्हापुरात आंदोलकांवर कारवाईची मागणी करण्यात आली.सोलापुरात मानवी साखळीद्वारे पुरोगामी संघटनांचा विरोधकेंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नागरिकत्व कायद्याला सोलापुरातील पुरोगामी संघटनेतर्फे मानवी साखळीद्वारे विरोध करण्यात आला. एनआरसी लिहिलेले कागद फाडून या कायद्याला विरोध करणारी प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली.चिपळुणात संविधान बचावसाठी मोर्चाहजारो हिंदू-मुस्लिम बांधवांनी गुरुवारी चिपळूण येथील रस्त्यावर उतरून शासनाचा मोर्चाद्वारे निषेध व्यक्त केला.कोल्हापुरात आंदोलकांवर कारवाईची मागणीनागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणाºया समाजकंटकावर कारवाई करा, अशी मागणी कोल्हापुरातील हिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.पुण्यात अभाविपचा मशाल मोर्चासुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उतरली आहे. परिषदेने गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मशाल मोर्चा काढून कायद्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. अभाविपचे कार्यकर्ते, विद्यार्थ्यांनी कायद्याच्या समर्थनार्थ मशाल मोर्चा काढला. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘पुणेकरांचे सीएएला समर्थन’, ‘मी सीएएचे समर्थन करतो’ असे फलक हातात घेतले होते. तसेच सीएएच्या समर्थनार्थ अभाविप मैदानात अशी घोषणाबाजी करण्यात आली.मालेगावात मुस्लिम संघटनांचा बंदनाशिक : नागरिकत्व दुरूस्ती कायदा रद्द करावा,अशी मागणी करत दस्तुर बचाव कमिटी, कुलजमाते तन्जीम, दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी गुरूवारी (दि.१९) मालेगाव येथे विराट मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शविला. याशिवाय शहराच्या पूर्व भागात कडकडीत बंद पाळण्यात आला तर पश्चिम भागात दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. यावेळी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. सदर मोर्चाला वंचित बहुजन आघाडी, रिपाइं सेना, भारीप बहुजन संघ यांच्या पदाधिकाºयांनी व्यासपीठावरुन पाठिंबा दिला.विद्यापीठात संघटना समोरासमोर भिडल्या, औरंगाबादमध्ये राडाच्औरंगाबाद : पोलिसांची परवानगी नसताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. सीएए कायद्याला विरोध असणाºया संघटनांच्या पदाधिकाºयांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. यात समर्थक आणि विरोधक संघटना समोरासमोर भिडल्या. धक्काबुक्कीही सुरू झाली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.च्विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत सीएए, एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ आणि विद्यापीठातील दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाला काळे फासल्याच्या निषेधार्थ अभाविपतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला विद्यापीठ प्रशासनासह पोलिसांनीही परवानगी नाकारली होती. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.च्२२अभाविपच्या पदाधिकाºयांनी नियोजित वेळी प्रशासकीय इमारतीसमोर दाखल होऊन हातात फलक धरून आंदोलनाला सुरुवात केली. अभाविप आंदोलकांंच्या समोर येऊन एसएफआय, एनएसयूआय, एमआयएम विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाºयांनी घोषणाबाजी सुरू केली. समर्थक व विरोधक संघटना समोरासमोर आल्या. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी सचिन निकम अभाविपच्या पदाधिकाºयांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या पदाधिकाºयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असतानाच पोलिसांनी दंगाकाबू पथकासह अतिरिक्त कुमक मागविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.