शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

आता पाण्याचे एटीएम !

By admin | Updated: March 23, 2015 01:12 IST

कोणताही सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे, कारखाने नाहीत. आपल्याकडे निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो.

अविष्कार देशमुख ल्ल नागपूरकोणताही सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे, कारखाने नाहीत. आपल्याकडे निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो. काही ठिकाणी तर अतिवृष्टी होते. पण उन्हाळ्याचे शेवटचे दोन महिने पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. इतकी उठाठेव केल्यावरही मिळणारे पाणी शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही. हे टाळण्यासाठी आता पाण्याचे एटीएम ही नवी संकल्पना पुढे येत असून, याद्वारे १०० टक्के शुद्ध पाणी नागरिकांना पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहिला प्रयोग नागलवाडीतशहरातील नागरिकांना सध्या काही प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा होत असला तरी पाण्यात असणाऱ्या क्षारामुळे जडपणा येत आहे. मात्र आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत खासगी कंपन्यांच्या मदतीने शहरालगत अनेक भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र ‘एटीएम’ लावण्यात येणार आहे. याची सुरुवात हिंगणा येथील नागलवाडी ग्रामपंचायतीपासून होणार आहे़ नागरिकांना मिळेल वॉटर कार्डनागरिकांना वॉटर कार्ड देण्यात येणार असून, मुबलक पिण्याचे पाणी ‘प्रीपेड सिस्टीम’ने वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. टंचाईग्रस्त भागामध्ये प्रीपेड स्मार्टकार्ड सिस्टीमद्वारे पाणी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना केवळ २० पैसे प्रति लिटर शुद्ध पाणी पुरवण्यात येईल. कार्ड स्वीप करा, पाणी मिळवावॉटर एटीएम पाणी पिण्यास लायक नसलेल्या बोअरवेल्सला अथवा पाण्याच्या टाकीला जोडण्यात येतील. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक अल्ट्रा फिल्टरेशन, नॅनो फिल्टरेशन, ओझोनिझेशन आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. स्टोरेज युनिटमध्ये एकदा पाणी पडल्यास लोक कार्ड स्वीप करून पाणी मिळवू शकतील. जेवढे लिटर पाणी हवे आहे तेवढा आकडा मशिनवर टाकून कार्ड स्वीप करावे लागेल. एटीएम २४ तास अविरत सेवा देणार आहे. नागरिकांनी पाणी किती वेळा काढले तसेच त्यांच्या कार्डमधून पैशांचा व्यवहार होण्यासाठी सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली आहे. सौरऊर्जेवर चालेल एटीएमग्रामीण भागात विजेची समस्या आहे. त्यामुळे हे एटीएम यंत्र २४ तास चालण्यासाठी बॅटरी बॅकअपची सोय करण्यात आली आहे. या एटीएमच्या टाकीवर सोलर यंत्र लावण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत राहील.च्कंपनीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी वॉटर एटीएमची सोय करून देतो. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांचा पुढाकार हवा. जवळपास चार लाख प्रति युनिटला खर्च येतो. नागरिकांना २० पैशांत १ लिटर शुद्ध पाणी यातून उपलब्ध होते, असे वॉटर केअर टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चरडे यांनी सांगितले.नागरिकांना वॉटर कार्ड देण्यात येणार असून, मुबलक पिण्याचे पाणी ‘प्रीपेड सिस्टीम’ने वाजवी दरात उपलब्ध होणार आहे.