शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्षा निकालाची!

By admin | Updated: July 28, 2015 02:32 IST

याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी आता

नागपूर : याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी सकाळी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहातील तयारीची पाहणी करून संबंधितांची प्रदीर्घ बैठक घेतली. नेहमीप्रमाणे सोमवारीसुद्धा त्यांनी पत्रकारांना टाळले. फाशी टाळण्यासाठी याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज सादर करून सर्वोच्च न्यायालयात डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. तर दयेच्या अर्जाबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने साऱ्यांच्या नजरा आता मंगळवारकडे लागल्या आहेत. गुरुदासपूरला झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या सतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना अधिकच कडक केल्या. कारागृहात जाणारे नागरिक, वकील आणि पत्रकारच नव्हेतर पोलिसांचीही रीतसर तपासणी केली जात होती.हेलिकॉप्टरने टेहळणीएक हेलिकॉप्टर आणि छोटे विमान दुपारी आलटून-पालटून वारंवार कारागृहाच्या वरच्या भागात टेहळणी करून कारागृहाच्या आतमधील तसेच बाहेरच्या भागातील स्थितीची पाहणी करीत होते. कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सोमवारी पुन्हा आतमधील फाशी यार्डसह अनेक बराकींची स्वत: पाहणी केली. ‘तेथील’ तयारी अंतिम टप्प्यात असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. सुरक्षेसंदर्भात कुणी लहानशी चूक करीत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बजावून सांगितल्याचे समजते.