शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्षा दुसऱ्या यादीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:17 IST

अकरावीच्या पहिल्या यादीत झालेल्या गोंधळानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले आहे. २० जुलैला सायंकाळी ५ वाजता अकरावीची दुसरी यादी

- लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावीच्या पहिल्या यादीत झालेल्या गोंधळानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले आहे. २० जुलैला सायंकाळी ५ वाजता अकरावीची दुसरी यादी जाहीर होणार आहे. अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळामुळे दुसऱ्या यादी जाहीर होईपर्यंत विद्यार्थी आणि पालकांवर तणावात आहेत. १० जुलैला अकरावीची पहिली यादी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. पण, संकेतस्थळावर माहिती अपलोड न झाल्याने रात्री १ वाजता यादी जाहीर करण्याची नामुष्की शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ओढावली होती. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण, हा प्रयोग यंदाही फसला आहे. विद्यार्थ्यांना दुसरा अर्ज भरताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे एक दिवस प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. हाच गोंधळ पुन्हा पहिल्या यादीवेळी दिसून आला. त्यामुळे आता दुसरी यादी तरी वेळेवर जाहीर होते की नाही, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. अकरावी प्रवेशासाठी तब्बल २ लाख ३६ हजार १४३ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले होते. यापैकी पहिल्या यादीत १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी पहिल्या फेरीत तब्बल ७९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही नामांकित महाविद्यालयांचा पहिल्या यादीचा कट आॅफ हा ९४ टक्के इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कटआॅफमध्ये घट दिसून आली. पण, दुसऱ्या यादीत कटआॅफ कितीने घसरतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.