शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाला आता हक्काचा कुलगुरु

By admin | Updated: August 12, 2015 23:16 IST

निकष बदलले : आॅक्टोबरनंतर प्रलंबित कामांचा होणार निपटारा--लोकमतचा प्रभाव

दापोली : कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव असावा, या अटीमुळे गेल्यावर्षी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी एकही पात्र उमेदवार मिळाला नसल्याचा अहवाल देऊन निवड समितीने भरती प्रक्रिया रद्द केली होती. आता शासनाने कुलगुरुपदाचे निकष बदलले आहेत. नव्या निकषानुसार दापोली कृषी विद्यापीठात १५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे निवड समितीने जाहीर केल्याने आॅक्टोबरअखेर विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांचा कार्यकाल २० डिसेंबर २०१४ रोजी संपला. त्यांचा कार्यकाल संपण्याआधी तीन महिने नव्या कुलगुरु निवडीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली होती. निवड समितीने पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले होते. आलेल्या अर्जांतून छाननी होऊन निवड समितीने कुलगुरु पदासाठी मुलाखती घेतल्या. त्यातून अंतिम निवडीसाठी पाच जणांची यादी तयार करण्यात आली. या पाचपैकी एका उमेदवाराला कुलगुरुपदाची संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु असे न होता कुलगुरुपदासाठी पाच वर्षे संचालकाचा अनुभव या निकषात राज्यातील एकही उमेदवार बसत नाही. तसेच ज्यांची पाच वर्षे पूर्ण आहेत, अशा पात्र उमेदवारांना पाच वर्षे वयोमर्यादेमुळे कुलगुरुपदाची संधी मिळत नव्हती. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी लायक उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे, असा अहवाल निवड समितीने शासनाला दिल्यामुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा पदभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. गेली ९ महिने दापोली कृषी विद्यापीठाचा कारभार परभणी कृषी विद्यापीठातून सुरु होता. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया रद्द झाल्यावर कुलगुरु पदासाठी राज्यातील एकही कृषी शास्त्रज्ञ पात्र नसेल तर निकष बदलावे यासाठी हालचाली सुरु झाल्या. दापोली कृषी विद्यापीठापाठोपाठ राहुरी कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या नेमणुका आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठात पात्र उमेदवार नसेल तर अमराठी भाषिक कुलगुरु बाहेरच्या राज्यातून आल्यास कृषी क्षेत्राचे नुकसान होऊ शकते. कुलगुरु पदाचे निकष काय असावेत, यासाठी कृषी विद्यापीठातून हरकती मागवण्यात आल्या होत्या. कृषी विद्यापीठाच्या सूचनांचे पालन करुन सुवर्णमध्य काढत शासनाने नवीन निकष लावल्यामुळे कृषी विद्यापीठ भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या विषयावर वृत्ताबरोबरच संपादकीयही लिहून या विषयाला वाचा फोडली होती. अखेरीस राज्य शासनाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून, कुलगुरूंबाबतचे निकषच बदलल्याने आता कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.कृषी विद्यापीठ कुलगुरुंबाबत लोकमतने केला होता पाठपुरावा.कुलगुरुपदाचे निकष बदलण्याची सर्वप्रथम दिली होती ‘लोकमत’ने बातमी.दापोली कृषी विद्यापीठातील डॉ. संजय भावे, डॉ. उत्तमकुमार महाडकर, डॉ. एस. एस. बुरटे या विभागप्रमुखांनाही संधी.