शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचे आंदोलन

By admin | Updated: April 15, 2016 12:38 IST

शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूर, दि.१५ - शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.  आता त्र्यंबकेश्वर, शबरीमाला आणि मुुंबईतील हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी आंदोलन केले जाणार आहे. हाजी अली दर्ग्यातील प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर राज्य सरकारने आपले म्हणणे मांडले आहे. येथील प्रवेशाच्या मुद्द्याबाबत काही मुस्लीम महिला संघटना मला भेटल्या आहेत. मुंबईत पुढील आठवड्यात त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती ठरविणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

‘अंबाबाई देवीच्या मंदिरातील बुधवारची स्थिती पाहता, हिंदुत्ववादी संघटनांनी माझ्या हत्येचा कट रचला होता. मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी माझ्यावर हल्ला झाला. सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित हल्ला करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा माझाही दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणे खून होईल,’ अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. पूर्ण स्थिती माहीत असूनही बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयात या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

अंबाबाईच्या मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी बुधवारी रात्री देसाई यांना विरोधी महिलांनी मारहाण केली होती. त्यानंतर, त्यांना रात्री उशिरा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देसाई म्हणाल्या, ‘अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याची पूर्वकल्पना पोलीस, प्रशासनाला दिली होती. तरीही पोलिसांनी १४४ कलम लावून माझ्यासमवेत आलेल्या काही महिलांना ताब्यात घेतले. मंदिरात मला विरोध करणारे बघितल्यानंतर, १४४ कलम केवळ भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनाच लागू होते का? असा प्रश्न निर्माण होतो. मंदिरात गेल्यानंतर पोलीस असतानाही माझ्यावर हल्ला झाला. त्यात गळा दाबला, कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. या वेळी पोलिसांचे नियोजन चुकीचे होते. शिवाय, ते बघ्याची भूमिका घेतात हे आश्चर्यकारक आहे.

त्यांनी संबंधित हल्लेखोरांना अडवून बाहेर काढले असते, तर हा प्रकार घडला नसता. एकूणच मंदिरातील स्थिती पाहता, हिंदुत्ववादी संघटना आणि मला विरोध करणाऱ्यांनी पूर्णपणे माझ्या हत्येचा कट रचला होता हे दिसून आले. राज्य व केंद्रात आमचे सरकार असल्याचे संबंधित संघटनांकडून बोलले जाते. त्याचा प्रत्यय मला बुधवारी आला.’ मारहाणीची स्वतंत्र चौकशी- प्रदीप देशपांडेश्रीअंबाबाई देवी मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांना सादर केला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांना सांगितले.