शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोन रोखणार आता रेल्वेचे अपघात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 05:32 IST

रेल्वे रुळांवरून ट्रेन घसरून होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आयआयटी रूरकीच्या मदतीने ड्रोन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण जाधवठाणे : रेल्वे रुळांवरून ट्रेन घसरून होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आयआयटी रूरकीच्या मदतीने ड्रोन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ड्रोनच्या माध्यमातून रेल्वे रूळांवर नजर ठेवली जाणार आहे. सध्या या ड्रोनची उत्तराखंडातील रेल्वे मार्गांवर चाचणी सुरू आहे. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून व रेलटेलच्या सहकार्याने हा ड्रोन विकसित केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.सध्या गँगमन रुळांची पाहणी करतात, परंतु दुर्गम भाग, पावसाळ्यात सर्वच रेल्वे रुळांवर नजर ठेवण्यास गँगमन पोहोचूशकत नाहीत. त्यामुळेच दोन रेल्वे रुळांमधील अंतर, रेल्वे रूळ, स्लीपर, वीजवाहक तारांसह अन्य ठिकाणांवर हा ड्रोन नजर ठेवेल. बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही भागात नक्षलवाद्यांकडून रेल्वे रुळांना हानी पोहोचविली जाते. काही समाजविघातक घटकही रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू टाकत असल्याचे मुंबई परिसरात अलीकडेच निदर्शनास आलेआहे. अशा प्रवृत्तींवरही हा ड्रोनची नजर असेल.२०१७-१८ मध्ये रेल्वे घसरून ५४ अपघात झाले होते. यात अनेकांना प्राण गमवावे लागले. गेल्या वर्षी त्यांची संख्या ७८ होती. हे अपघात रोखण्यास या ड्रोनची मदत होणार आहे. सुरुवातीला हे ड्रोन भारतीय रेल्वेचा रेलटेल विभाग करणार होता, परंतु या विभागाचे संशोधन आणि विभागात पुरेसे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळेच त्यांनी हे काम आयआयटी रूरकीकडे सोपविले आहे.असे रोखणार अपघातरेल्वे रुळास कुठे तडे गेले आहेत, गॅप वाढला आहे, रुळांवर काही पडले आहे का, डोंगरदऱ्यात दरडी कोसळल्या आहेत काय, वीजवाहक तारा तुटल्या आहेत, याची माहिती छायाचित्रे, व्हिडीओंद्वारे हा ड्रोन रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देणार आहे, नियंत्रण कक्षाचे नेटवर्क इंजिनचालकांशी जोडले गेले असल्याने संभाव्य अपघात रोखणे सोपे होणार आहे.याशिवाय रेल्वने आपल्या काही विभागांतील गँगमनला जीपीएस बँडही दिले आहे. त्या आधारे रेल्वे अपघात रोखण्याचाही प्रयत्न भोपाळ विभागात होत असल्याचे सांगण्यात आले.सध्या भारतीय रेल्वेच्या १२,३०० गाड्या ६७,३८१ किमी मार्गावरून धावत आहेत.