शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आता ‘ट्रॅफिक इन टच’

By admin | Updated: July 9, 2014 23:48 IST

अॅन्ड्रॉईड बेस स्मार्टफोनमध्ये माहितीचा खजिना असलेल्या अॅप्सची सध्या चलती आहे.

पुणो : अॅन्ड्रॉईड बेस स्मार्टफोनमध्ये माहितीचा खजिना असलेल्या अॅप्सची सध्या चलती आहे. तरुणाईच्या याच आवडीचा उपयोग वाहतूक नियमन आणि जनजागृतीसाठी करण्याच्या उद्देशाने पुणो शहर वाहतूक पोलिसांनी  ‘पुणो ट्रॅफिक अॅप’ तयार केले आहे. वाहतुकीसंदर्भातील माहिती, सेवा आणि कायदे यासंदर्भातील सविस्तर माहिती या अॅपमध्ये देण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. 
मराठी आणि इंग्रजीमध्ये असलेल्या या अॅपमध्ये वाहतूक पोलिसांचा संदेश, पुणो पोलीस, वाहतूक पोलीस यांच्या लिंक्स देण्यात आल्या आहेत. या लिंक्समधून त्या त्या विभागाशी आवश्यक आणि महत्त्वाची माहिती वापरकत्र्याला सहज उपलब्ध होणार आहे. अपघात झाल्यानंतर किंवा आणीबाणीच्या काळामध्ये जवळचे पोलीस ठाणो, रुग्णवाहिका, रुग्णालये यांसारख्या अत्यावश्यक सेवांची माहिती लगेचच अॅपवर झळकणार आहे. अनेकदा वाहतूक पोलिसांकडून वाहने उचलली जातात. अशा वेळी कुठे जायचे हे वाहनचालकाला या अॅपच्या माध्यमातून समजेल. 
गुगल लाईव्ह ट्रॅफिक, पब्लिक नोटीस, रस्ता सुरक्षा, रिक्षा आणि मोटार भाडे, फोटो व व्हीडीओ गॅलरी, डूज अँड डोण्ट्स अशा ऑप्शन्सद्वारे वाहनचालकांना हवी ती माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.                            (प्रतिनिधी)
 
4अनेकदा वाहतूक पोलिसांकडून दंडाच्या भल्या मोठय़ा रकमा सांगून वाहनचालकांची अडवणूक केली जाते. याचा विचार करून पोलिसांची खाबूगिरी रोखण्यासाठी अॅपमध्ये वाहतूक नियमभंगाचा प्रकार आणि त्याचा दंड याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच वाहतूक पोलिसांसाठी ट्रॅफिकॉपच्या धर्तीवर ‘पुणो ट्रॅफिकिंग’ हे अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये वाहतूक नियमभंग करणा:या वाहनचालकांची माहिती देण्यात आलेली आहे. या अॅपद्वारे एखाद्या वाहनचालकाने यापूर्वी कोणकोणते नियम तोडले आहेत, याची चौकातच मोबाईलवर माहिती उपलब्ध होणार आहे.
 
4वाहतूक पोलिसांचे हे अभिनव असे अॅप्स आणि लिंक तयार करण्यासाठी उपायुक्त विश्वास पांढरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांना या कामामध्ये पोलीस निरीक्षक (नियोजन) आर. एस. कामिरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
 
4हे अॅप तयार करण्यासाठी ‘टर्न हिअर’, ‘हार्ड कॅसल’, ‘अॅप डिव्हाइन’ या तीन ग्रुप्सने कष्ट घेतले. आयटी क्षेत्रतील तरुणांनी विनामोबदला हे अॅप्स तयार करून दिल्याबद्दल पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
 
दुबार लायसेन्सला 
बसणार चाप
वाहतूक पोलिसांनी लायसेन्स पकडल्यानंतर ते न्यायालयामध्ये पाठवण्यात येते. परंतु वाहनचालक न्यायालयातून लायसेन्स सोडवून घेण्याऐवजी हरवल्याची तक्रार दाखल करून दुबार लायसन्स काढतात. 
हा प्रकार टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक लिंक तयार केली असून, त्यावर जप्त करण्यात आलेल्या लायसेन्सची माहिती टाकण्यात आली आहे. 
आरटीओला ही लिंक देण्यात आली असून, नवीन अथवा दुबार लायसेन्ससाठी अर्ज आल्यास या लिंकवरून खात्री केली जाणार आहे. यामुळे खोटय़ा लायसेन्स मागणीला चाप बसणार आहे.