शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता नोटा बदलण्यासाठी ओळख पत्राच्या कॉपीची गरज नाही

By admin | Updated: November 16, 2016 11:24 IST

बँक कर्मचा-यांनी नोटा बदलून देताना ग्राहकांकडून त्यांच्या ओळख पत्राची किंवा कोणत्याही कागदपत्राची प्रत घेण्याची गरज नाही, असे आदेश 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने सर्व बँकांना दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - बँक कर्मचा-यांनी नोटा बदलून देताना ग्राहकांकडून त्यांच्या ओळख पत्राची किंवा कोणत्याही कागदपत्राची प्रत घेण्याची गरज नाही, असे आदेश 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने सर्व बँकांना दिले आहेत. नोटा बदलण्यासाठी आलेले ग्राहक बँक कर्मचा-यांना पुरावा म्हणून ओखळ पत्राची खरी प्रत दाखवत असतील तर त्याची झेरॉक्स कॉपी बँकेने घेण्याची गरज नाही, असे 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने स्पष्ट केले आहे. 
 
ओळख पत्राची प्रत जमा करण्याच्या नादात बँकांबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात वाढत जात असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, 'ज्या ग्राहकांचे बँकेत खाते आहे, त्यांच्याकडे ओळख पत्राची पत्र मागितली जात नाही. मात्र ज्या लोकांचे बँकेत खाते नाही त्यांच्याकडून ओळख पत्राची मागणी केली जात आहे', अशी माहिती लक्ष्मी विलास बँकेचे सीओओ यांनी दिली आहे. 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वसामान्यांनी जरी स्वागत केले असले तरी दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नोटांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर, एटीएम सेंटरबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासूनच लागत आहेत. काळा पैसा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती.