शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

निरक्षरता निर्मूलनासाठी आता ‘टीच’ उपक्रम

By admin | Updated: October 31, 2016 04:01 IST

रोटरीने ‘इंडिया लिटरसी मिशन’च्या अंतर्गत ‘टीच’ प्रोग्राम हाती घेऊन निरक्षरता निर्मूलनाचे काम सुरू केले

डोंबिवली : रोटरीने ‘इंडिया लिटरसी मिशन’च्या अंतर्गत ‘टीच’ प्रोग्राम हाती घेऊन निरक्षरता निर्मूलनाचे काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत शिक्षकांना सक्षम बनवणे, शिक्षकांचा तुटवडा असलेल्या शाळांमध्ये स्वयंसेवक नेमणे, उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांना ‘नॅशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.राधिका गुप्ते या जिल्हापातळीवर शिक्षकांच्या सक्षमतेसाठी कार्यरत आहेत. त्या एक हजार ते दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. टीच म्हणजे ‘टी’ म्हणजे टीचर, ‘ई’ म्हणजे ई-लर्निंग, ‘ए’ म्हणजे प्रौढ शिक्षण, ‘सी’ म्हणजे म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट, ‘एच’ म्हणजे हॅपी स्कूल, असे याचे विभाजन केले आहे. मुलांच्या अकार्यक्षमतेविषयीची जागृती याअंतर्गत शिक्षकांना प्राथमिक शाळेतच मूल शिकत असतानाच गतिमंदत्व ओळखणे, निदान करणे व प्रतिबंध व उपचारासंबंधी माहितीची आवश्यकता निदर्शनास आली म्हणून ‘गतिमंदत्व’या विषयावर कार्यशाळा होणार आहे. त्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राहटोळी, बदलापूर यांच्याद्वारे तालुकापातळीवर सर्व प्राथमिक शाळा शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, अंबरनाथ, मुरबाड येथील ४६८ जिल्हा परिषद शाळा तसेच सर्व भाषिक ५१९ शाळांमधील शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. यासंदर्भातील पहिली कार्यशाळा राहटोळी येथे नुकतीच झाली. त्याला ४० विशेषतज्ज्ञ व साधन व्यक्तींची उपस्थिती होती. या कार्यशाळेला प्रशिक्षणार्थ्यांचा चांगला सहभाग होता. या वेळी गुप्ते लिखित ‘ओळख गतिमंदाची व कोशातील व्यक्तिमत्त्व’ ही पुस्तके सर्वांना उपयुक्त ठरली. चंद्रशेखर कोलवेकर यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तीपत्रक दिले. दुसरी कार्यशाळा दिवाळीनंतर होणार आहे. या उपक्रमात सातत्य राहणार असल्याचे राधिका गुप्ते म्हणाल्या.>सामाजिक कार्यात सक्रिय‘रोटरी इंटरनॅशनल’ने पोलिओ हा दुर्धर रोग हटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रोटरी सतत समाजातील कमतरता आणि गरज पाहून प्रयत्नशील आहे. या वेळी रोटरीयन प्रकाश बने, मनोज प्रधान, रमेश गुप्ते, राजीव प्रभुणे, ज्योती कुलकर्णी उपस्थित होते.