शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी आता घ्या ‘रोबो’चा सल्ला

By admin | Updated: January 19, 2016 03:30 IST

एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल, तर तुमची जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक स्थिती, गुंतवणुकीचे लक्ष्य अशा सर्व गोष्टींची पडताळणी

मुंबई : एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल, तर तुमची जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक स्थिती, गुंतवणुकीचे लक्ष्य अशा सर्व गोष्टींची पडताळणी करून तुम्हाला ‘योग्य’सल्ला देण्यासाठी रोबो तंत्रज्ञान सज्ज होत आहे. संवेदनशील अशा गुंतवणुकीच्या क्षेत्रात आता रोबोचा संचार होणार असल्यामुळे, गुंतवणूकदारांना तांत्रिकदृष्ट्या योग्य सल्ला मिळतानाच दुसरीकडे प्रक्रियेतील वेगही वाढणार आहे. गुंतवणुकीच्या सल्ल्यासाठी सध्या अनेक देशांतून रोबोचे तंत्रज्ञान वापरले जाते, परंतु भारतामध्ये हा वापर फारच कमी कंपन्यांकडून आणि तोही मर्यादित प्रमाणात होतो. केवळ तीन ते चार प्राथमिक प्रश्नांपुरता हा वापर मर्यादित आहे. जगात या तंत्रज्ञानाला वाढता प्रतिसाद लक्षात घेत, आता भारतीय कंपन्यांनीही रोबोचा वापर त्याच्या पूर्ण क्षमतेने करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार त्याची नव्याने मांडणी करण्यात येत आहे. गुंतवणुकीसाठी रोबोचे तंत्रज्ञान किती उपयुक्त ठरू शकते, याचे विश्लेषण करताना चार्टर्ड अकाउंटंट अजित जोशी म्हणाले की, ‘सध्या देशामध्ये गुंतवणुकीच्या पॅटर्नमध्ये काही उणिवा आहेत. कारण सध्या जर एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल, तर योग्य वित्तीय सल्ला घेण्याऐवजी संबंधित व्यक्ती आपल्या मित्राने अथवा नातेवाईकाने काय आणि कशात गुंतवणूक केली आहे, याची माहिती घेत, त्यानुसार स्वत:चीदेखील गुंतवणूक करतात. यामध्ये आपल्या मित्राची परिस्थिती अथवा जोखीम घेण्याची क्षमता यांचा विचार न करता, सरसकट गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल असतो. परिणामी, गुंतवणूक आणि परताव्याचे गणित फसताना दिसते, तर दुसरा पॅटर्न म्हणजे वित्तीय सल्लागार अथवा एखाद्या कंपनीच्या एजंटमार्फत तो ज्या योजनेचे यशस्वी मार्केटिंग करेल, त्या योजनेत गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो, पण काही लोकांना संबंधित एजंटला ज्या योजनेत कमिशन जास्त असते, त्याचीच विक्री करण्याकडे त्याचा कल असल्याचा अनुभव आलेला आहे. रोबोमधील विशेष सॉफ्टवेअरमार्फत गुंतवणूकदाराचे विश्लेषण करून योजना सुचविणे अधिक उपयुक्त ठरेल.’ (प्रतिनिधी)