शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यभर धावणार एसटीच्या एसी व्होल्वो बस

By admin | Updated: March 3, 2016 04:31 IST

खासगी बसेसचा प्रवास एसटीपेक्षा आरामदायी असल्याने, प्रवाशांचा ओढा खासगी बसेसकडे असतो. त्यामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे

मुंबई: खासगी बसेसचा प्रवास एसटीपेक्षा आरामदायी असल्याने, प्रवाशांचा ओढा खासगी बसेसकडे असतो. त्यामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. उच्च न्यायालयाने वारंवार बजावल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यभर एसी बसेस आणि स्लीपर कोच सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.एसटीच्या वेगवेगळ्या विभागांकडे एस. टी. महामंडळाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे एसटीने विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू व अन्य जणांना सलवत देण्याचे बंद करू, असा इशारा सरकारला दिला. याची गांभीर्याने दखल घेत, व्यवसायाने वकील असलेले दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेची व्याप्ती वाढवत उच्च न्यायालयाने एसटीचे नुकसान नक्की कोणामुळे आणि कशामुळे होते? अशी विचारणा महामंडळाकडे केली. त्यावर महामंडळाने यास मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस जबाबदार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारला एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना फिरू देऊ नका, तसेच नियम मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने सरकारला दिले. खासगी बसेसप्रमाणे एसटीनेही प्रवाशांना आरामदायी सुविधा द्यावी, अशी सूचना सरकारला केली होती.त्यानुसार, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सरकारने आसनी एसी, स्लीपर कोच यासारख्या बसेस, राज्यातील सर्व मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी वाहतूक करणाऱ्यांवर नजर राहील. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचेही अ‍ॅड. वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने ही सर्व माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश सरकारला देत, या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली. (प्रतिनिधी) > ‘आरामदायी प्रवासासाठी सरकारने सेमी स्लीपरसारख्या बसेस विकत घेण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली आहे. आता या बसेस केवळ मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक इत्यादी मार्गांपुरत्या मर्यादित न राहता, सर्व राज्यभर धावतील,’ अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली.