शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता आॅन द स्पॉट ‘पंचनामा’

By admin | Updated: March 2, 2016 02:21 IST

एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळीच पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे तत्काळ फॉरेन्सिक लॅबला पाठवणे नवी मुंबई पोलिसांना शक्य होणार आहे.

नवी मुंबई : एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळीच पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे तत्काळ फॉरेन्सिक लॅबला पाठवणे नवी मुंबई पोलिसांना शक्य होणार आहे. याकरिता गुन्हे शाखेच्या वतीने विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाला तपासासाठी तसेच पुरावे जमवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने पुरवण्यात आलेली असल्याने स्पॉट पंचनाम्यातल्या त्रुटी टळणार आहेत.हत्या, जबरी दरोडा किंवा इतर गंभीर गुन्ह्यांच्या वेळी स्थानिक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागते. विशेष प्रशिक्षण नसतानाही त्यांना गंभीर गुन्ह्यातले पुरावे गोळा करण्यापासून ते हाताळणीपर्यंतची महत्त्वाची भूमिका त्यांना बजावावी लागते. मुळातच घटनेनंतरचे पहिले काही क्षण पोलिसांच्या तपासाकरिता अत्यंत महत्त्वाचे असतात. या कालावधीत त्यांना घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हेगाराविरोधातले पुरावे देखील गोळा करायचे असतात. अशावेळी छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणामुळे सबळ पुरावा देखील नष्ट होऊ शकतो. परिणामी गुन्हेगार हाती लागूनही सबळ पुराव्याअभावी न्यायालयातून तो सुटू शकतो. शिवाय घटनास्थळावरून जप्त केलेले शस्त्र किंवा तपासाकरिता महत्त्वाचा सुगावा असलेल्या बाबी तत्काळ फॉरेन्सिक लॅबला पाठवतानाही पोलिसांना पुरेपूर खबरदारी घ्यावी लागते. या सर्वांवर पर्याय म्हणून नवी मुंबई पोलिसांनी शिघ्र तपास पथक तयार केले असून, त्यामध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक व १० कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश आहे. एका वेळी एक उपनिरीक्षक व पाच कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्याकरिता सर्व सुविधा उपलब्ध असलेली व्हॅन देखील बनवली आहे. या व्हॅनमध्ये लेखनसामुग्री, पॅकिंग, लिप्टिंग मटेरियल, मेडिकल कीट, सिलिंग मटेरियल, टूल कीटचा समावेश आहे. यापुढे आयुक्तालयात कोणतीही गंभीर दुर्घटना घडल्यास हे पथक तत्काळ घटनास्थळी पोचुन आॅन द स्पॉट पंचनामा करणार आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी या पथकाला प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार या पथकाचे प्रात्यक्षिक मंगळवारी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपायुक्त दिलीप सावंत, विश्वास पांढरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (प्रतिनिधी)