शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आता विभागीय पातळीवर सोशल इंजिनीअरिंग

By admin | Updated: June 6, 2014 11:42 IST

भाजपाच्या छत्रखाली अठरापगड जातींना एकत्र आणून सोशल इंजिनीअरिंग करण्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना यश आले होते.

भाजपाची नवी रणनीती : विभागनिहाय नेतृत्वामार्फत सामाजिक समरसता दृढ करण्याचा प्रय} करणार
यदु जोशी - मुंबई
भाजपाच्या छत्रखाली अठरापगड जातींना एकत्र आणून सोशल इंजिनीअरिंग करण्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना यश आले होते. आता त्यांच्या निधनानंतर हे काम राज्य पातळीवर पुढे नेऊ शकेल, अशा नेत्याची भाजपाला वानवा भासणार असल्यामुळे विभागीय पातळीवर तिथल्या नेत्यांच्या पुढाकाराने हा वसा पुढे चालविण्याचा प्रय} पक्षातर्फे केला जाणार आहे. 
1982मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्याजवळील तळजाई येथे झालेल्या शिबिरात तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सामाजिक अभियांत्रिकीची कल्पना मांडली होती. ‘जातीभेद करणो हे पाप नसेल, तर मग जगात कुठलीही गोष्ट पाप नाही,’ या शब्दांत त्यांनी जातीभेदावर प्रहार केले होते. तेव्हापासून संघ परिवारातील विविध संघटना सोशल इंजिनीअरिंगची संकल्पना राबवू लागल्या. पुढे मुंडेंनी या कल्पनेचा विस्तार केला. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुंडे यांच्यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम भाजपामध्ये एव्हाना सुरू झाले आहे. त्यातूनच सामूहिक नेतृत्वाची कल्पना पुढे आली आहे. आता त्याच्याही पुढे विभागनिहाय नेतृत्वामार्फत राजकारणात सामाजिक समरसता दृढ करण्याचा प्रय} केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत अलीकडे महायुतीला  मोठे यश मिळाले.
 मुंडे यांच्या पुढाकारातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, रामदास आठवले यांची रिपाइं आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष यांची मोट बांधली गेली. हाच प्रयोग विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला जाईल, असे पक्षाच्या सूत्रंनी सांगितल़े 
 
शिवसेनेचा राजकीय कित्ता भाजपानेदेखील गिरवावा
शिवसेनेत जातीय राजकारणाला कधीच खतपाणी घातले जात नाही. त्यामुळे या संघटनेत बहुजन समाज मोठय़ा प्रमाणात आला. सेनेने निवडणुकीतील तिकीट वाटपातदेखील जातीभेद केला नाही. शिवसेनेचा हा राजकीय कित्ता भाजपानेदेखील गिरवावा, असा सूर आता पक्षात उमटत आहे.