ठाणे : पाकिस्तानात पेशावर येथे शाळेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पाशर््वभूमीवर ठाणे महापालिकेनेही सावधानता बाळगण्यास सुरुवात केली आहे. महापालिका हद्दीतील शाळांसाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात यावेत, अतिरेकी हल्ला झाल्यास त्याचा सामना करण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मॉकड्रील घेण्यात यावे, अशी सूचना करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने ही माहिती दिली.पाकिस्तानात शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळेतील सुरक्षेचा प्रश्नही लावून धरण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या ७८ इमारतींत १२१ शाळा आहेत. तर हद्दीत एकूण ७०४ शाळा आहेत. यातील महापालिका शाळांच्या ७८ इमारतींसाठी १२० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. ही संख्या वाढविण्याच्या दृष्टीने लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.खासगी ७०४ शाळानांही भूकंप, आग, अतिरेकी हल्ल्याचा सामना करता यावा म्हणून कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आता ठाणे महापालिकेतर्फेदेण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेने सुरक्षारक्षक नेमावेत शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमरे लावावेत त्याच जोडीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाळांमध्ये मॉकड्रील घ्यावे जेणेकरून अतिरेकी हल्ला झाल्यास त्याचा मुकाबला करण्यास योग्य ती उपाय योजना करणे सोपे होईल, असे सूचनापत्रक प्रत्येक शाळेला शनिवार पासून देण्यात येणार आहे.
आता शाळांसाठी सुरक्षा आराखडा
By admin | Updated: December 20, 2014 02:48 IST