शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता चौकात झळकतील उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे फोटो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 17:52 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गंत राज्यात मागील दोन वर्षांपासून अभियान राबविण्यात येत आहे.

नंदकिशोर नारे/ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 28 - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गंत राज्यात मागील दोन वर्षांपासून अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानुसार वाशिम शहर ३१ मार्च २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने व तसे शासनाचे आदेश असल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आता उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे फोटो शहरातील प्रमुख चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत उघडयावर शौचालयास जाणाऱ्यांचे नावे त्या परिसरात जाहीर केल्या जात होते आता फोटो लागणार असल्याने उघडयावर शौचास जाणाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. वाशिम शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी वाशिम नगरपरिषदेकडून एकूण ३६७० लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करण्याकरीता अनुदान देण्यात आलेले आहे, त्यापैकी आॅगस्ट २०१६ पर्यंत फक्त ४२७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. अभियानाला गती देत २५ डिसेंबरपर्यंत ११६९ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे.शौचालय बांधणीचा वेग वाढविण्यासाठी नगरपरिषदेने केलेली उपाय योजनाअनुदान घेतलेल्यांनी शौचालयाचे बांधकाम केले किंवा नाही हे पाहण्यासाठी ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला १०० लाभार्थ्यांची यादी दिली आहे. कर्मचारा्यांची टीम दररोज पाहणी करुन या कामाचा आढावा घेत आहे. वाशिम नगरपरिषदेच्या प्रत्येक महिला बचत गटांना सुध्दा वाशिम शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता त्यांच्या भागातील २५ लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक बचत गट दररोज जनजागृती करुन आढावा घेत आहे. नगरपरिषदेच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकास , शिक्षकास सुध्दा २५ लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. तसेच शाळेत ज्या पाल्यांच्या घरी शौचालय नाही अशांना बोलावून पालक सभेचे आयोजन करुन शौचालयाचे महत्व विषद करीत आहेत. यासह प्रत्येक वार्डात विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली, कलापथकांच्यावतिने जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.शौचालय नसलेल्यांना मुकावे लागणार या सुविधांपासूनजे लाभार्थी शौचालय बांधणार नाहीत त्यांच्या घरातील नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे.  न.प. सेवा व शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.  संबधित लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून अशा लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.शहरातील हागणदारीमुक्त होण्यासाठी नाइलाजास्तव कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी अनुदान घेऊन शौचालय बांधले नाहीत त्यांनी ते त्वरित बांधून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीपासून वाचावे. उदयापासून (२९ डिसेंबर) उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे फोटो मात्र चौकात झळकणारच आहेत. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे.- गणेश शेटेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम