शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

आता जनताच भाजप सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करेल : अशोक चव्हाण

By admin | Updated: November 14, 2016 22:56 IST

मात्र आता जनता हुशार झाली आहे़ आगामी निवडणुकांमध्ये सरकारवरच ही जनता पलटेल व सर्जिकल स्ट्राईक करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी केले़

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 14 : दुष्काळ गेला लोकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही ना जनावरांना चारा़ दसरा, दिवाळी असे सण एकापाठोपाठ गेले, पण जीवनावश्यक वस्तुंचे दर कमी झाले नाहीत़ अच्छे दिनह्णच्या नावाखाली सरकार विविध पद्धतीने जनतेवरच सर्जिकल स्ट्राईक करू लागले आहे, मात्र आता जनता हुशार झाली आहे़ आगामी निवडणुकांमध्ये सरकारवरच ही जनता पलटेल व सर्जिकल स्ट्राईक करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी केले़

पंढरपूर येथील शिवतीर्थावर आयोजित काँग्रेस व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते़ व्यासपीठावर आ़ भारत भालके, आ़ रामहरी रुपनवर, स़ शि़ वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य धर्मा भोसले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, दिनकर पाटील, राजेश भादुले, अर्जुन पाटील यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उदमेवार संतोष नेहतराव आणि सर्व उमेदवार उपस्थित होते़

अशोक चव्हाण म्हणाले, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, येथे खोटे बोललेले चालत नाही़ मात्र मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री आले, विकासकामे करण्याचे आश्वासन देऊन निघून गेले़ पण कामे तशीच राहिली आहेत़ ते कोण करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ सुजाण मतदारांनो आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे़ मी मुख्यमंत्री असताना पंढरपूर शहराचा विकास आराखडा तयार करून ४०० कोटींचा निधी मंजूर केला़ त्यातील सुमारे १०० कोटींची विकासकामे झाली़ दुर्दैवाने सत्ता गेली आणि उर्वरित कामे तशीच राहिली़ राज्याच्या कानाकोपऱ्यातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक येतात, किमान त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत़ मात्र या सरकारला सामान्यांचे काही देणे-घेणे नाही़ सामान्यांच्या प्रश्नांची जाण नाही़ म्हणूच सध्या केवळ सामान्यांचेच हाल होत आहे़

५०० व १००० रुपयांच्या चलनातून बंद केल्या यावर बोलताना खा़ अशोक चव्हाण म्हणाले, या नोटा बंद केल्या पण बँकांसमोर उभे राहण्यासाठी टाटा, बिर्ला किंवा अंबानी नव्हते तर सर्वसामान्य नागरिक उभे होते़ सर्वसामान्यांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे़ काळा पैसा बाहेर करण्यासाठी हा उठाठेव केला पण यासाठी नियोजन करणे आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले़आ़ भारत भालके म्हणाले, गत निवडणुकीत आमचे १८ उमेदवार विजयी होऊन सत्ता स्थापन केली़ झपाट्यांने विकासकामे करायला सुरुवात केली़ रस्ते कामांना प्राधान्य दिले़ आराखडा तयार करून २०१४ सालांपर्यंत अनेक विकासकामे केली, मात्र काही विजयी उमेदवारांनी खोडा घातला आणि पैशासाठी निघून गेले़ परिणामी सत्ता गेली़ इच्छाशक्ती असतानाही कामे करता आली नाहीत़ अजूनही शहरात खड्डे, धूळ आहे़ त्यामुळे सूज्ञ मतदारांनी विचार करून सुशिक्षित पदवीधर उमेदवार संतोष नेहतराव हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत़ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पुन्हा काम करणाऱ्यांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले़

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव म्हणाले, सध्या सर्व नगरपालिकांमध्ये अत्याधुनिक पद्धतीने कामे सुरू आहेत, परंतु पंढरपूर नगरपरिषदेत कोणत्याही कामांसाठी आठ-आआठ दिवस थांबावे लागते़ यात बदल करावयाचा असेल तर एकदा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले़.तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर काँग्रेस सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी होते़ दुष्काळ पडला तर टँकरद्वारे पाण्याची सोय केली़ जनावरांसाठी चारा छावण्या काढल्या़ शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले़ पण भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणे-घेणे नाही़ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर या सरकारचा डोळा आहे़ त्यामुळे आगामीी काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर बसविला तर आश्चर्य वाटायला नको़ राज्यात गेल्या अडीच वर्षांत नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ त्यांना मदत करणे सोडा पण साधे भेटून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याचे कामही या सरकारमधील मंत्र्यांनी केले नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली़