शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालवाडीत आता नवा अभ्यासक्रम

By admin | Updated: March 4, 2016 00:21 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्या सक्षम करण्यासाठी आणि तेथील शिक्षण पद्धतीत नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश, आनंददायी शिक्षण देण्याच्या उद्देशाने सभापती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्या सक्षम करण्यासाठी आणि तेथील शिक्षण पद्धतीत नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश, आनंददायी शिक्षण देण्याच्या उद्देशाने सभापती चेतन घुले व उपसभापती नाना शिवले यांनी बालवाडीचे समन्वयक व बालवाडीताईंची बैठक घेतली. बालवाडीताईंशी संवाद साधला. आगामी शैक्षणिक वर्षापासून बालवाड्यांना अभ्यासक्रम देण्याचे सभापती घुले यांनी जाहीर केले.महापालिकेच्या चिंचवड स्टेशन येथील शाळेत ही बैठक झाली. या वेळी सदस्य धनंजय भालेकर, विजय लोखंडे, लता ओव्हाळ, सविता खुळे, शिरीष जाधव, निवृत्ती शिंदे, श्याम आगरवाल, विष्णू नेवाळे, चेतन भुजबळ, फजल शेख, प्रशासन अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे, संजीवनी मुळे, कुसुम बोदडे, अरुणा शिंदे, सुरेखा मारणे, अलका शिंदे, नलिनी साळी उपस्थित होत्या.बैठकीत बालवाड्या सक्षम करण्या संदर्भात बालवाडीताईंशी संवाद साधला. सूचनाही घेतल्या. अभ्यासक्रमामध्ये एकसलगता व एकसूत्रीपणा आणण्यासाठी जून २०१७ पासून बालवाड्यांना अभ्यासक्रम देण्याचा निर्णय सभापती घुले यांनी घेतला. (प्रतिनिधी)कारेकर म्हणाले, ‘‘तीन ते सहा वर्षांचा हा काळ बालविकास व बालशिक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा काळ असतो. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, भाषिक, कलाविषयक अशा सर्वच विकासाचा पाया या कालावधीत घातला जातो. प्रत्येक गोष्ट करून बघण्याची उत्सुकता, अनुकरणातून शिकण्याचा प्रयत्न देखील या काळाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. विकासाच्या या टप्प्यावर मूल समूहात मिसळण्यास उत्सुक असले, तरी ते स्वकेंद्रितही असते. या सगळ्या बाबी ध्यानात घेऊन सर्वच बालवाड्यांमध्ये बालवर्गाची रचना, क्रियाकलापांची योजना, शिक्षकाची भूमिका व कार्यपद्धती आखण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.’’