शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांप्रमाणेच आता सचिवदेखील फिरणार

By admin | Updated: November 7, 2015 03:01 IST

राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे

मुंबई : राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे. सर्व विभागांचे सचिव आठवड्यातून दोन दिवस दौऱ्यावर राहतील, असा आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज काढला.एरवी मंत्री दौरे करतात आणि सचिव मुख्यत्वे मंत्रालयात बसून असतात. मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची जबाबदारी काही सचिवांकडे सोपविली होती. पालक सचिव ही जुनी संकल्पना प्रशासनात आहेच, पण पालकमंत्री फिरतात त्याच्या १० ते २० टक्केही पालक सचिव संबंधित जिल्ह्याचा दौरा करत नाहीत, असा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशात, विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव या सर्वांनाच मंत्रालयाच्या वातानुकूलित कक्षातून बाहेर काढून राज्यभर दौऱ्यांवर पाठविण्याची भूमिका घेतली आहे. सर्व सचिवांनी ग्रामीण भागांत मुक्काम करून सामान्यांशी संवाद साधावा व त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे मुख्य सचिवांनी आदेशात म्हटले आहे. राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. त्यांची गावपातळीपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणे गरजेचे आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेणे, सामान्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हे दौरे आवश्यक असल्याचे फर्मान मुख्य सचिवांनी काढले आहे. (विशेष प्रतिनिधी)क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागणारपूर्वी वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन सखोल तपासणी करत. तीच पद्धत अवलंबण्यात येईल. भेटीदरम्यान समोर आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी ते मार्गदर्शन करतील. मुख्य सचिव सचिवांनी केलेल्या कामाची नोंद मूल्यमापन अहवालात करतील. मुख्य सचिवही दौरा करणारमुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय स्वत:देखील राज्याचा दौरा करणार आहेत. लोकोपयोगी योजनांचा आढावा ते या भेटीत घेणार आहेत.