शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

आता मॅरेथॉन स्पर्धाही वादात

By admin | Updated: May 10, 2017 00:05 IST

ठाणे महापालिकेतील आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांच्या वादात आता महापौर मॅरेथॉन स्पर्धा ओढली गेली आहे. या स्पर्धेसाठीची

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेतील आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांच्या वादात आता महापौर मॅरेथॉन स्पर्धा ओढली गेली आहे. या स्पर्धेसाठीची तरतूद आयुक्तांनी ५० लाखांवरून ३० लाख केल्याने लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत. महापौर दालनात मंगळवारी झालेल्या स्पर्धेविषयीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. आयुक्तांनी स्पर्धेसाठीची तरतूद कमी केल्याने यंदा कोणत्याही प्रायोजकाचा आधार न घेता ही स्पर्धा घ्यावी अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. यामुळे तुटपुंज्या निधीत ही स्पर्धा घ्यायची कशी असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. यामुळे मागील वर्षी प्रायोजकांच्या मेहरबानीवर मॅरेथॉन स्पर्धेला इव्हेंट मॅनेजमेंटचे स्वरुप प्राप्त करुन देणाऱ्या ठामपा प्रशासनाला २७ व्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी इव्हेंटची योजना गुंडाळावी लागणार असल्याचे दिसत आहे.दोन वर्षापूर्वी महापालिकेने ही स्पर्धा खाजगी इव्हेंट मॅनेजमेंटच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, प्रयत्न करुनही ते शक्य न झाल्याने अखेर पालिकेनेच काही खाजगी स्पॉन्सर्सच्या मदतीने ती पार पाडली. तर गेल्या वर्षी महापालिकेने या स्पर्धेवर होणारा खर्चाचा भार लक्षात घेऊन खाजगीकरणाच्या माध्यमातून ही स्पर्धा हायटेक केली. स्पर्धा राज्यपातळीवरुन थेट अखिल भारतीय स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे या स्पर्धा प्रायोजकांच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या स्पर्धेचा खर्च हा सुमारे ३५ ते ४० लाखांच्या घरात जात होता. परंतु, तीन वर्षापासून हा खर्चदेखील अपुरा ठरत असल्याने पालिकेने खाजगी वितरकांची मदत घेण्यास सुरवात केली. त्यामुळे हा खर्च कोटीच्या घरात गेला होता. दरम्यान मंगळवारी दुपारी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दालनात ठाणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटीक्स संघटना आणि पालिकेच्या क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजिली होती. या बैठकीत खर्चाबाबत चर्चादेखील झाली असून त्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात प्रायोजकांच्या मदतीची अपेक्षा ठेवून आयुक्तांनी ५० लाखांची तरतूद ३० लाखांची केली आहे. परंतु, यातील प्रशासनाची मेख लक्षात आल्याने लोकप्रतिनिधी अथवा महापौर कोणते प्रायोजक शोधणार नसल्याचे यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले. यामुळे आहे त्याच बजेट मध्ये स्पर्धा कशी घ्यायची असा पेच आता प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती प्रशासनाने पुन्हा महापौरांकडे केल्याचे समजते.