शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांसोबत दर्जावरही महारेराची आता करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:59 IST

ग्राहकांना दिलासा : गुणवत्ता हमी प्रमाणपत्र विकासकांना बंधनकारक

मुंबई : विकासकांकडून घर घेणाऱ्या ग्राहकांची कोणत्या प्रकारची लूट किंवा फसवणूक होऊ नये, यासाठी महारेराची निर्मिती करण्यात आली होती. त्याप्रमाणे, विकासकांनी आपला कुठलाही गृहप्रकल्प तयार करण्यापूर्वी त्याची नोंदणी करणे महारेराकडे बंधनकारक असते.

मात्र, आता कोणत्याही गृहप्रकल्पाच्या बांधकामावरही महारेराची करडी नजर असणार आहे. कारण यापुढे गृहप्रकल्प उभारताना वापरल्या जाणाºया बांधकाम साहित्याचा दर्जा योग्य आहे का? यासंबंधीचे गुणवत्ता हमी प्रमाणपत्रही प्रत्येक विकासकाने सादर करणे महारेराने बंधनकारक केले आहे. याबाबतचे परिपत्रक महारेराने नुकतेच जाहीर केले. हक्काचे घर घेणाºया ग्राहकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

विकासक खूप वेळा दिलेल्या वेळेत घराचा ताबा देत नाहीत. आधी सांगितल्याप्रमाणे ज्या सोईसुविधा गृहप्रकल्प घेताना दाखविल्या जातात, त्या सोईसुविधा त्या दर्जाप्रमाणे नंतर ग्राहकांना मिळत नाहीत. विकासक दिलेल्या आराखड्यानुसार आपल्या गृहप्रकल्पाचे बांधकाम करत नाहीत. करार करताना कागदावर दाखविण्यात आलेले क्षेत्रफळ आणि गृहप्रकल्प उभारल्यानंतरचे क्षेत्रफळ यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. या सर्व गोष्टींमुळे विकासकांकडून ग्राहकांची अनेकदा फसवणूक होते. त्याचबरोबर, गृहप्रकल्प उभारताना बांधकाम साहित्यातही निकृष्ट दर्जाचा माल वापरल्याने भिंतींना भेगा पडणे, घरात पाण्याची गळती होणे, स्लॅब कोसळणे, फरशांना भेगा पडणे अशा गोष्टी घडत असतात. या संदर्भातील अनेक तक्रारी ग्राहकांमार्फत महारेराकडे आल्या.

याचा विचार करूनच महारेराने विकासकांविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. यापुढे विकासकांना आपल्या गृहप्रकल्पाची नोंदणी केल्यावर बांधकाम साहित्याच्या दर्जाबद्दल महारेराला विस्तृत माहिती द्यायची आहे. गृहप्रकल्प उभारताना वापरल्या जाणाºया बांधकाम साहित्याच्या दर्जाबाबतचे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र प्रत्येक विकासकाने महारेराला सादर करणे बंधनकारक केले आहे.फसवणुकीला आळा बसणारमहारेराच नवीन निर्णयानुसार, बांधकामात वापरल्या जाणाºया सिमेंट, रेती, लोखंड आणि इतर साहित्यांचा किती प्रमाणात वापर केला, याची नोंद करणारे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र यापुढे विकासकांना सादर करावे लागणार आहे. त्यामुळे आता विकासकांना आपला गृहप्रकल्प उभारताना बांधकाम साहित्याच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावे लागेल. शिवाय यामुळे ग्राहाकांच्या होणाºया फसवणुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.