शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘रासप’चे एकला चलो रे !

By admin | Updated: May 25, 2016 02:46 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आझाद मैदानात आयोजित केलेल्या महोत्सवापासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंगही फुंकणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.युतीचे सरकार असले, तरी रासप सत्तेत नसल्याचे म्हणत जानकर यांनी आपली खंत व्यक्त केली. भाजपावर पूर्ण विश्वास असून मंत्रिपदासाठी भीक मागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पक्षाचे जास्त आमदार नसल्याने मंत्रिपदासाठी सरकारवर दबाव टाकता येत नाही आहे. त्यामुळे लायकी वाढवूनच सरकारवर नियंत्रण ठेवू. सर्वच मित्रपक्षांनी दावा करताना चिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.मुंबई मनपा निवडणुकीत स्वबळावर लढत असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. ते म्हणाले की, दरवेळी अहिल्याबाई होळकर यांची जयंती चोंडी येथे करत होतो. मात्र आगामी निवडणुकांसाठी यंदा हा कार्यक्रम आझाद मैदानात घेत आहे. या वेळी सुमारे लाखो कार्यकर्ते येण्याचा दावाही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी, रिपाइंचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले आणि रासपचे आमदार व नेते यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. (प्रतिनिधी)