शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आता संप करणार नाही!

By admin | Updated: May 5, 2016 01:59 IST

आपल्या मागण्यांसाठी दर वेळी संपाचे शस्त्र उगारून सामान्य रुग्णाला वेठीस धरणाऱ्या मार्डने अखेरीस बुधवारी उच्च न्यायालयाला पुन्हा संपावर जाणार नाही, अशी हमी दिली. या हमीनंतर

मुंबई : आपल्या मागण्यांसाठी दर वेळी संपाचे शस्त्र उगारून सामान्य रुग्णाला वेठीस धरणाऱ्या मार्डने अखेरीस बुधवारी उच्च न्यायालयाला पुन्हा संपावर जाणार नाही, अशी हमी दिली. या हमीनंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आतापर्यंत काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, याची माहिती ५ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिला.जे. जे. रुग्णलायचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्रचिकित्सक विभाग प्रमुख रागिणी पारेख यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी जे. जे. रुग्णालयाच्या रहिवासी डॉक्टरांना संप पुकारला होता. त्यांच्या समर्थनसाठी राज्याच्या अन्य डॉक्टरांनीही संप पुकारला. त्यामुळे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांचे हाल झाले. अफाक मांडविया यांनी डॉक्टरांच्या संपाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. डॉक्टरांना संप मागे घेण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.मागण्या मान्य करण्यासाठी आाम्ही रुग्णांना वेठीस न धरता आंदोलन करू, असे मार्डच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. उच्च न्यायालयाने त्यांनी दिलेली हमी स्वीकारली. दरम्यान, मार्डच्या वकिलांनी डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. या वर्षभरात डॉक्टरांवर पाच वेळा हल्ले करण्यात आले आहेत. राज्य सरकार डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी काहीही ठोस उपाययोजना आखल्या नाहीत, असे मार्डच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.राज्य सरकारने आतापर्यंत त्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना आखल्या आहेत? अशी विचारणा खंडपीठाने राज्य सरकारकडे केली. त्यावर महाअधिवक्ता रोहित देव यांनी कायद्यात तरतूद करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी) ‘सरकारी रुग्णालयांत सीसीटीव्ही फुटेज बसवण्यात आले आहेत. तसेच ८९६ अतिरिक्त पोलीस बळ पोलिसांच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे, यासाठी उच्च स्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. तोपर्यंत कंत्राटवर सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत,’ अशी माहिती अ‍ॅड. देव यांनी उच्च न्यायालयाला दिली.खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १० जून रोजी ठेवली आहे.