शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता फोनवर मिळणार शहरातील प्रदूषणाची माहिती!

By admin | Updated: July 14, 2015 01:33 IST

मुंबापुरीला दिवसेंदिवस प्रदूषणाचा धोका वाढतोय, मात्र याबद्दल सामान्य मुंबईकर अनभिज्ञ आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाची अचूक माहिती मुंबईकरांना

मुंबई : मुंबापुरीला दिवसेंदिवस प्रदूषणाचा धोका वाढतोय, मात्र याबद्दल सामान्य मुंबईकर अनभिज्ञ आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाची अचूक माहिती मुंबईकरांना देण्यासाठी आता एका कॉलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई शहर-उपनगरातील कोणत्याही भागातील वायुप्रदूषणाची मात्रा सामान्यांना टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.‘सफर’अर्थात सिस्टीम आॅफ एअर क्वॉलिटी अ‍ॅण्ड फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च या अ‍ॅप्लिकेशनचे काही दिवसांपूर्वी अनावरण करण्यात आले. या अ‍ॅपनेही अवघ्या काही दिवसांत दीड हजार डाउनलोड्सचा टप्पा पार केला. नव्याने सुरू होणाऱ्या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून आता वायुप्रदूषणाच्या पातळीबद्दल सामान्यांना माहिती मिळेल. ही सेवा येत्या १० दिवसांत मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचे पूर्वानुमान आणि संशोधन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनाही आपल्या परिसरातील हवेची परिस्थिती जाणून घेणे शक्य होणार आहे. यापूर्वी पुणे, दिल्ली शहरांत ही सेवा २०१३पासून सुरू झाली आहे. त्यात दिल्लीत महिन्याला जवळपास १५ हजार कॉल्स येतात; तर पुण्यात महिनाकाठी ४ हजार कॉल्सची नोंद करण्यात आली. भारतीय भू विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, प्रादेशिक हवामान खाते (पुणे) यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.‘सफर’ उपक्रमांतर्गत सुरू होणाऱ्या नव्या सेवेमुळे वाढत्या वायुप्रदूषणाबाबत मुंबईकर जागरूक होतील. या माध्यमातून वायुप्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे विज्ञान क्षेत्राला नवीन दिशा मिळणार असून, या उपक्रमाचा भविष्यात आणखी विस्तार झाला पाहिजे.- डॉ. गुफ्रान बेग, प्रकल्प संचालक