शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आता छुपे कॅमेरे टिपणार लाचखोरांचे कृत्य!

By admin | Updated: October 24, 2014 23:30 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा नवा प्रयोग: लाचखोरीला आळा बसण्याची अपेक्षा.

नागेश घोपेवाशिम: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने आता लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यासाठी छुप्या कॅमेर्‍यांचा वापर करण्याची योजना आखली आहे. ज्याला लाच मागितली आहे त्याच्या सोबत कुणी आल्यास, लाचखोर रक्कम घेण्याचे टाळतात, असे अनेक प्रकरणांमध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाचखोरांना पकडण्यासाठी उच्च कार्यक्षमतेच्या छुप्या कॅमेर्‍यांचा वापर करून, त्यांना रंगेहाथ पकडण्याची मोहीम, एसीबी लवकरच राज्यभरात अंमलात आणत आहे. सदर छुपे कॅमेरे लाच स्वीकारल्या जात असल्याचे चित्रिकरणच करणार आहेत. लाचखोरांच्या विरोधात न्यायालयात खटला चालविताना, सदर चित्रिकरण सज्जड पुरावा म्हणून वापरता येणार आहे. एसीबीने यापूर्वी मुंबईत छुप्या कॅमेर्‍यांचा वापर केला होता. मुंबईत लाभलेल्या यशानंतर आता हा प्रयोग राज्यभरात राबविला जाणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत, राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक जागरूकता मोहीम राबविली जाणार आहे. त्यानंतर प्रथम मोठ्या शहरांमध्ये, छुपे कॅमेरे काही विशिष्ट कारवाईच्या वेळी वापरले जाणार आहेत. सध्या एखाद्या सरकारी कर्मचारी अथवा अधिकार्‍याने लाच मागितल्यास, त्याच्यासोबतच्या संभाषणाचे ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) केले जाते. त्यासाठी छोटा रेकॉर्डर वापरला जातो. कायद्यातील तरतुदीनुसार ही सारी प्रक्रिया पंचांसमक्ष व्हावी लागते. लाचखोरांना हे माहीत असल्यामुळे, ज्याला लाच मागितली आहे, त्याच्या सोबत इतर कुणी आल्यास, अनेक चतुर लाचखोर लाच स्वीकारत नाहीत. लाच देताना कुणीही साक्षीदार उपस्थित असणार नाही, याची ते खबरदारी घेतात. त्यामुळे अनेकदा कारवाईत तांत्रिक उणिवा राहतात आणि कारवाई झालले अधिकारी, कर्मचारी ते स्वच्छ असल्याचा दावा करतात. यावर उपाय म्हणून चित्रिकरणाचा पर्याय समोर आला आहे. लाच घेतानाचे नेमके चित्रिकरण व्हावे म्हणून अगदी शर्टाच्या बटणाएवढ्या छोट्या आकाराच्या कॅमेर्‍याचाही वापर होणार आहे. गेल्या वर्षभरापासून लाचखोरांच्या विरोधात एसीबीची मोहीम जोरात सुरू आहे. गत दहा महिन्यांत राज्यात तब्बल एक हजार जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. छुप्या कॅमेर्‍यांचा वापर सुरू झाल्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात लाचखोर जाळ्यात अडकतील, अशी अपेक्षा आहे.