शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्टंटमॅनसाठी आता आरोग्य आणि अपघात विमा योजना

By admin | Updated: April 25, 2017 13:46 IST

अक्षय कुमारच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्ययही ब-याचदा आला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. मग ती शहिदांना मदत असो वा एखाद्या गरजू किंवा गरजवंताला केलेली मदत, नेहमीच अक्षय कुमार हा मदतीसाठी तत्पर असतो. अक्षय कुमारच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्ययही ब-याचदा आला आहे. तसेच त्यांच्या सामाजिक कार्यावर कोणीही शंका देखील उपस्थित करू शकत नाही. सीमेवर लढणा-या जवानांबाबत तर त्याला फार आपुलकी आणि आत्मियता आहे, हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. अक्षय कुमारनं पुन्हा एकदा सामाजिक भान जपलं आहे. स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमार लवकरच स्टंटमॅन आणि स्टंटवूमनसाठी एक जीवन विमा सुरक्षा कवच घेऊन येणार आहे. या जीवन विमान योजनेनुसार स्टंटमॅनना जवळपास 10 लाख रुपयांपर्यंत विमा कवच प्राप्त होणार आहे. प्रसिद्ध कारडिअ‍ॅक सर्जन डॉ. रमाकांत पांडा हेही या योजनेत सहभागी झाले असून, या निमित्तानं अक्षय आणि पांडा एकत्र आले आहेत. या योजनेचा 18 ते 55 या वयोगटातील जवळपास 380 स्टंटमॅन आणि स्टंटवूमनला फायदा मिळणार आहे.यावेळी पांडा म्हणाले, स्टंट करणा-या कलाकाराचं हृदय हे कठोर असतं. स्टंटमॅन हा चित्रपटातील खरा नायक असून, त्याचं चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा असतो. त्यामुळेच त्याला जीवन विमान सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. अक्षय हा माझा जवळचा मित्र आहे आणि तो एक स्टंट कलाकार असल्यामुळे त्याला चित्रपटसृष्टीतील स्टंटमॅनच्या वेदना माहीत आहेत. अक्षय कुमारच्या पाठिंब्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. डॉ. रमाकांत यांनी 2009मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ऑपरेशन केले होते. त्याप्रमाणेच त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरही शस्त्रक्रिया केली होती.तसेच अक्षय कुमारनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी पहिला स्टंटमॅन आहे आणि मग अभिनेता. माझा स्टंट आणि अभियन चित्रपटातील त्या भूमिकेनुसार बाहेर येतो, असा मला विश्वास आहे. याचं सगळं श्रेय क्रीडा नृत्य-दिग्दर्शक आणि स्टंट समुदायाला जातं. चित्रपटसृष्टीतील स्टंटमॅनची वेदना जाणून त्यांच्यासाठी जीवन विमा कवच आणणारे आणि त्या अभियानासाठी मला पात्र समजणारे डॉ. रमाकांत पांडा यांचा आभारी आहे, असंही अक्षय कुमार म्हणाला आहे. अक्षयच्या जीवनातील हा फार मोठा निर्णय आहे. तसेच ही संकल्पना अक्षय कुमार लवकरच प्रत्यक्षात आणणार आहे. स्टंटमॅन आणि वूमनसाठी सुरू होणारी ही पहिलीच जीवन विमा योजना असेल. ही संपूर्ण संकल्पना अक्षयची स्वतःची असून कारडिअ‍ॅक सर्जन डॉ. रमाकांत पांडा हेही या योजनेत सहभागी आहेत.
या जीवन सुरक्षा विमा योजनेनुसार स्टंट करताना कोणतीही दुखापत झाली किंवा अपघात झाला तर स्टंटमॅनला रुग्णालयात उपचार घेण्यासाठी 6 लाखांचा विमा कॅशलेस पद्धतीने देण्यात येणार आहे. ही सुविधा जवळपास 4 हजार रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्टंट करताना जर एखाद्या स्टंटमॅन / स्टंटवूमनचा मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देखील मिळणार आहेत. एकंदरीतच ही जीवन विमा योजना स्टंटमॅनसाठी लाभकारी सिद्ध होणार आहे.