शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आता तुरुंगांमध्ये व्यायामशाळा

By admin | Updated: May 11, 2016 03:46 IST

राज्यातील तुरुंगांमध्ये व्यायामशाळा सुरू करण्यासंबधीचा प्रस्ताव तुरुंगाचे अधिकारी लवकरच सादर करणार आहेत. तुरुंगातील कच्च्या कैद्यांची काहीही शारीरिक हालचाल/व्यायाम होत नसल्यामुळे

डिप्पी वांकाणी, मुंबईराज्यातील तुरुंगांमध्ये व्यायामशाळा सुरू करण्यासंबधीचा प्रस्ताव तुरुंगाचे अधिकारी लवकरच सादर करणार आहेत. तुरुंगातील कच्च्या कैद्यांची काहीही शारीरिक हालचाल/व्यायाम होत नसल्यामुळे त्यांना जीवनशैलीचे आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यायामशाळांचा प्रस्ताव असल्याचे गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. शिक्षा झालेल्यांना ती भोगून होईपर्यंत त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार व्यायाम करणे सक्तीचे आहे. आज तुरुंगांतील एकूण कैद्यांपैकी ७० टक्के कच्चे कैदी आहेत. आता त्यांना तुरुंगांच्या आवारात झाडे लावावी लागतील.कच्च्या कैद्यांची तुरुंगात कोणतीही शारीरिक हालचाल होत नसल्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो. त्यांच्याकडे बराच मोकळा वेळ असतो. त्यामुळे तुरुंगांत त्यांना व्यायाम करता येईल, यासाठी व्यायामशाळा सुरू कराव्यात, असा आमचा विचार असल्याचे तुरुंगांची जबाबदारी असलेले प्रधान सचिव (गृह) सतबीर सिंग (भारतीय प्रशासन सेवा-आयएएस) यांनी सांगितले. या व्यायामशाळेतील उपकरणांविषयी सिंग म्हणाले की, ‘व्यायामांची बरीच साधने एकाच जागी घट्ट बसविलेली असतील. कैदी मारामाऱ्यांत त्यांचा वापर करू शकणार नाहीत. डंबेल्ससारखी साधने त्यांना दिली जाणार नाहीत.’कच्च्या कैद्यांकडून तुरुंगाच्या आवारात झाडे लावण्यासाठीचा सरकारी ठराव (जीआर) लवकरच संमत केला जाईल. ज्या तुरुंगांत पुरेशी जागा उपलब्ध आहे, तेथेच झाडे लावली जातील, असे त्यांनी सांगितले. व्यायामशाळा आणि वृक्षारोपणाशिवाय कच्च्या कैद्यांसाठी पुस्तके असलेले ग्रंथालय आणि बागकाम, चित्रकला, संगीत आदी उपक्रम सुरू केले जातील. त्यांच्यासाठी प्रेरणादायी आणि धार्मिक पुस्तके या ग्रंथालयात ठेवली जातील. चित्रे काढण्यासाठी आवश्यक ते साहित्य पुरविले जाईल, असे सिंग म्हणाले. डब्ल्यूएचओने केलेल्या व्याख्येप्रमाणे कच्चे कैदी हे आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असले पाहिजेत. या तिन्ही अंगांनी कच्चे कैदी उत्तम आरोग्याचे असले पाहिजेत, असे आमचे प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले. व्यायामशाळेचा विचार सध्या अमूर्त रूपात आहे. त्याचा तपशील लवकरच पूर्ण होईल, असे सिंग म्हणाले.