शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाईलवर भरा मिळकत कर, पाणीपट्टी

By admin | Updated: January 21, 2016 01:29 IST

शहरातील मिळकतधारकांना आता आपल्या स्मार्ट फोनवरूनही मिळकतकर तसेच पाणीपट्टी भरता येणार आहे. महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत पालिकेकडून

पुणे : शहरातील मिळकतधारकांना आता आपल्या स्मार्ट फोनवरूनही मिळकतकर तसेच पाणीपट्टी भरता येणार आहे. महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत पालिकेकडून ही सुविधा नागरिकांना देण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही सुविधा येत्या प्रजासत्ताक दिनापासून सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यता मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्व स्तरांवर काम सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे मोबाईल अ‍ॅपवर पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी पुणे ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरणार आहे. यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन संगणकाच्या माध्यमातून ही बिले नागरिकांना भरण्याची सुविधा देण्यात आलेली होती. शहराचा स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच, नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग महापालिकेच्या विविध विभागांच्या माहितीसाठी तसेच त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त सुविधा आॅनलाइन पद्धतीने देण्यासाठी पालिकेकडून विविध अ‍ॅप्स विकसित केली जात आहेत. शहरात तब्बल साडेसात लाख मिळकती असून, त्यातील जवळपास एक ते दीड लाख मिळकतधारक आॅनलाइन पद्धतीने कर भरतात. ही संख्या वाढत असल्याने तसेच जास्तीत जास्त नागरिक स्मार्टफोन वापरत असल्याने आता पालिकेकडून हा मिळकतकर मोबाईल अ‍ॅप्सवर भरण्यासाठी आॅनलाइन गेट वे प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठीचे अ‍ॅप्स तयार असून, त्याची प्राथमिक चाचणीही झाली आहे. मात्र, त्यासाठी काही मान्यतांची आवश्यकता असल्याने ही मान्यता मिळविण्याचे काम सुरू असून, येत्या प्रजासत्ताक दिनी ही सुविधा आरंभ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.या अ‍ॅप्सवर महापालिकेच्या जवळपास १५ विभागांची माहितीही असणार असून, नागरिकांना वेगवेगळ्या विषयासंदर्भात तक्रारी करता याव्यात, यासाठीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)