शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठी आता प्रथम लेखी परीक्षा

By admin | Updated: April 20, 2016 05:36 IST

पोलीस खात्यातील रिक्त पदांच्या भरतीसाठी एका जागेसाठी १५० पेक्षा अधिक उमेदवार या प्रमाणात अर्ज आल्यामुळे उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा विचार पोलीस खाते क

डिप्पी वांकाणी  , मुंबईपोलीस खात्यातील रिक्त पदांच्या भरतीसाठी एका जागेसाठी १५० पेक्षा अधिक उमेदवार या प्रमाणात अर्ज आल्यामुळे उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा विचार पोलीस खाते करीत आहे. या भरती प्रक्रियेतील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले की, जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येईल.या निर्णयामुळे शारीरिक चाचणी देणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होईल. ४८३३ रिक्त जागांच्या या भरतीसाठी ७ लाख ५८ हजार ७२२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्या पाच जिल्ह्यांतून सर्वाधिक अर्ज आले आहेत. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर ग्रामीण आणि पालघर या शहरांचा समावेश आहे. पोलीस खात्यात भरती होताना शारीरिक क्षमता ही महत्त्वाची मानली जाते, त्यामुळेच आतापर्यंत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. भरती प्रक्रियेतील ही पद्धत बदलण्याचा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार, प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेण्याचा मुद्दा समोर आला. त्यामुळे शारीरिक चाचणीसाठीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात कमी होतील. अंदाजे ते रिक्त जागांच्या वीसपट अधिक असतील. शारीरिक परीक्षेसाठी यंदा किमान ३० दिवसांचा कालावधी लागेल. शारीरिक क्षमता चाचणीसाठी अधिक वेळ लागतो. कारण समन्वय आणि चाचणीसाठी जागेच्या निवडीपासून ते पूर्वतयारीपर्यंत अनेक बाबींकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक परीक्षा ठेवल्यास तुलनेत ही प्रक्रिया अधिक सोपी आहे. लेखी व शारीरिक परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुण असतील.