शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता सर्वांचेच विजयाचे दावे

By admin | Updated: October 16, 2014 04:32 IST

सेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने त्याचा फायदा रायगडात शेतकरी कामगार पक्षाला

सेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने त्याचा फायदा रायगडात शेतकरी कामगार पक्षाला होऊन अलिबागमध्ये पंडित पाटील, पेणमध्ये धैर्यशील पाटील, उरणमध्ये विवेक पाटील तर पनवेलमध्ये बाळाराम पाटील विजयी होणार, असा दावा शेकापचा आहे. पनवेलमध्ये प्रशांत ठाकुरच येणार असा आत्मविश्वस भाजपाचा आहे. तर दुसरीकडे, पनवेल काँग्रेसचेच असून तेथे आर.सी.घरत विजयी होणार, असा काँग्रेसजनांचा दावा आहे.श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपले पुतणे अवधुत तटकरे यांना विजयी करण्याकरिता पणाला लावलेली प्रतिष्ठा फळास येणार असे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे रविंद्र रामजी मुंढे यांनी दिलेली लढत जोरदार आहे, परिणामी येथे सेनेलाच यश मिळÞणार असा विश्वास शिवसेनेचा आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे हनुमंत पिंगळे यांच्यातच खरी लढत झाली. पिंगळे यांचे पारडे जड असल्याचे येथे सांगितले जात आहे. महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांच्याशी काँग्रेसचे माणिक जगताप यांची कडवी झुंज झाली. मतदानाच्यावेळÞी राष्ट्रवादीने जगताप यांना सहकार्य केल्याची चर्चाहोती. तरी पुन्हा गोगावलेच विजयी होणार असा दावा सेनेचा आहे.