शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आता दरवर्षी हापूस लगडणार !

By admin | Updated: April 22, 2015 04:29 IST

डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि इस्रायली तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून हापूस लागवडीबाबत केलेल्या प्रयोगांना यश आले असून,

शिवाजी गोरे, दापोली (जि. रत्नागिरी)डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि इस्रायली तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून हापूस लागवडीबाबत केलेल्या प्रयोगांना यश आले असून, या नव्या तंत्रज्ञानामुळे दरवर्षी हापूसचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. या प्रयोगात हापूस कलमाचे पुनरुज्जीवन करण्यावर भर देण्यात आला असून, त्यामुळे खर्चातही मोठी कपात होणार आहे.कोकणातील हापूस आंब्याची बहुतांश लागवड ही पारंपरिक पद्धतीने १०Ÿ१० मी अंतरावर होते. अनेक बागांमध्ये झाडे उंच वाढली असून, पाने व खोड यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. हापूसला मोहोर एक वर्ष आड येतो. मात्र या संशोधनामुळे आता दरवर्षी हापूस झाडाला लगडणार आहे़ उत्पादकता वाढवण्यास तसेच नवीन बागांसाठी सुधारित तंत्रज्ञान विकसित करण्यास केंद्र सरकारने इस्त्रायलच्या सहकार्याने आंबा गुणवत्ता केंद्र स्थापन केले. या केंद्रात जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन, आंब्याची सधन लागवड, दर्जेदार आंबा कलमांची निर्मिती व त्यासाठी सुधारित मूळकांडांचा वापर याबाबत विविध प्रयोग हाती घेण्यात आले. हे तंत्रज्ञान विकसित होत असताना थेट शेतावरही त्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन व पुनरुज्जीवन केलेल्या आंबा बागांचे घनलागवडीमध्ये रूपांतर हे महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. झाडे आटोक्यात आल्यामुळे फवारणी, काढणी आदी मशागतीची कामे अत्यंत सुलभपणे करता येतात. हे तंत्रज्ञान विकसित करण्यास ४०० प्रशिक्षक तयार करण्यात आले असून, १० हजारांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.