शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्राचे देशात आता अकरा विभाग !

By admin | Updated: August 26, 2015 00:54 IST

दमण-दीवसह तीन राज्यांचे मुख्यालय पुण्यात.

अकोला : शेतीचा पाया भक्कम करण्यासाठी अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत नेण्याची खरी गरज असल्याने कृषी मंत्रालयाने कृषी विज्ञान केंद्राचा (केव्हीके)विस्तार व बळकटीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी देशात अकरा विभाग केले असून, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्र, गोवा व गुजरात या तीन राज्यांचे नवे मुख्यालय पुणे येथे सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत सहज पोहोचवता येत असल्याने कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला असून, या केंद्राचे व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी केव्हीकेचे विभाग वाढविण्यात आले आहेत. या अगोदर देशात नऊ विभाग होते. आता अकरा विभाग करण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठे, कृषी संस्थांनी अनेक मोलाचे कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तथापि, हे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शक्य असल्याने देशात नवी १0९ कृषी विज्ञान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. त्याचसोबत या केंद्रांना बळकट करण्यासाठी शास्त्रज्ञांची संख्या ६ वरू न ९ करण्यात आली आहे. या अगोदर त्यांना विषय विशेषज्ञ म्हटले जात होते, आता त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ असे पदनाम देऊन पगारात वाढ करण्यात आली आहे. या वरिष्ठ शास्त्रज्ञांसह या केंद्राच्या इतर २२ तज्ज्ञ कर्मचार्‍यांचे वर्ग वाढविण्यात आले आहे. शेती विकासासाठी कृषी विद्यापीठांसह कृ षी विज्ञान केंद्रे काम करीत असून, विविध शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठीची मोलाची जबाबदारी पार पाडीत आहे. देशात आजमितीस ६४२ कृषी विज्ञान केंद्रे आहेत. यातील ४४ कृषी विज्ञान केंद्रे या राज्यात असून, १३ कृषी विज्ञान केंद्रे ही विदर्भात आहेत. त्यापैकी सात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत तर सहा केंद्रे इतर संस्था चालवित आहेत. कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार संचालनालयामार्फत केव्हीकेचे कामकाज चालते. पुण्यात कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था पुणे येथील विभागाचे कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. या अगोदर हैद्राबाद येथील झोनल कार्यालयांतर्गत महाराष्ट्राचे काम चालत होते.