शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात आता २४ तास खा, प्या अन् खरेदीही करा, दुकाने, रेस्टॉरन्ट्स रात्रभर राहणार खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:10 IST

राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.

 विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.या निर्णयाने मुंबईत नाइट लाइफ बिनबोभाट सुरू होणार असे मात्र नाही. मुंबईसह राज्यभर अनेक बंधनेही सरकारने टाकली आहेत. कोणत्या भागात कोणत्या आस्थापना किती वेळ सुरू ठेवायच्या याचा अधिकार पोलीस विभागाला असेल. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. ज्या आस्थापनांमध्ये ५० पेक्षा अधिक महिला काम करतात त्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकांना करावी लागेल. शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाºयांसाठी कँटिनची व्यवस्था करणे अनिवार्य असेल.महिला कर्मचाºयांना रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही आस्थापना मालकांची असेल. तसेच प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.सध्याचा नियम काय म्हणतो...सध्या दुकाने, आस्थापना रात्री दहापर्यंत बंद करावी लागतात. १५ मिनिटांची वाढीव वेळ असते. रेस्टॉरंट्स रात्री साडेबारापर्यंत बंद करावी लागतात. एक तास वाढीव वेळ पोलीस परवानगीने घेता येतो. पानटपºया रात्री ११च्या आत, तर व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री साडेनऊला बंद करावी लागतात.विधान परिषदेत परीक्षा बाकीयाच विधेयकात दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या लहान आस्थापनांना परवान्यांची गरज नसेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा फायदा ३८ लाख आस्थापनांना होईल आणि इन्स्पेक्टर राज संपुष्टात येणार आहे.या विधेयकातील तरतुदींचे उल्लंघन करणाºया आस्थापना मालकांना तसेच एखाद्या कर्मचाºयाचा अपघात झाल्यास मालकास २ ते ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे.हे विधेयक विधान परिषदेत मंजूर व्हावे लागेल आणि राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.हॉटेलचालक आणि खवय्यांच्या दृष्टीने हा फायदेशीर निर्णय आहे. विशेषत: मुंबईसारख्या शहरांत तीन शिफ्टमध्ये कार्यालये सुरू असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेसही चाकरमान्यांना जेवणाचा पर्याय उपलब्ध असेल.- संतोष शेट्टी, सचिव-आहार२४ तास दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णयाचा फायदा व्यापाºयांसह ग्राहकांनाही होईल. रात्री-अपरात्री घरी परतणाºया ग्राहकांना हवे ते आणि हवे तेव्हा उपलब्ध होईल.- मोहन गुरूनानी, व्यापाºयांचे नेते