शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी!

By admin | Updated: April 21, 2015 01:28 IST

प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळांच्या धर्तीवर राज्यात आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याचे राज्य सरकारच्या

कमल शर्मा, नागपूरप्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळांच्या धर्तीवर राज्यात आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते़ याला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिला. मध्य प्रदेश व गुजरातमध्ये अशा प्रकारच्या स्वतंत्र वीज कंपन्या कार्यरत आहेत़ मुंबईवगळता राज्याच्या इतर भागात महावितरणचा एकाधिकार आहे. परिणामी प्रादेशिक असमतोल निर्माण होत असल्याचा आरोप केला जात होता़ हा असमतोल दूर करून प्रत्येक विभागाला न्याय देण्यासाठी भाजपा सरकारने विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याचा विचार सुरू केला आहे़ यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वितरण कंपनी असेल. सर्व कंपन्यांचे स्वतंत्र प्रबंध संचालक राहतील़ सूत्रांनी सांगितले की, फडणवीस सरकारने यासंबंधात पुढाकार घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी घेतलेल्या संबंधितांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली़ ६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून वितरण, पारेषण आणि उत्पादन या विभागांचे अनुक्रमे महावितरण, महापारेषण आणि महाजेनको या तीन कंपन्या स्थापन करण्यात आल्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होल्ंिडग कंपनी स्थापण्यात आली. आता राज्यात वीज वितरणाला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़