शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती

By admin | Updated: August 18, 2016 19:53 IST

शहरातील रस्ता व गल्ली बोळात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी त्यांच्या जन्मावर बंधन घालण्यात येणार आहे.

मोकाट कुत्र्यांना आवरणारनीलेश शहाकारबुलडाणा, दि. 18 : शहरातील रस्ता व गल्ली बोळात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी त्यांच्या जन्मावर बंधन घालण्यात येणार आहे. त्यासाठी अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल(डॉग्ज) रूल्स नुसार राज्यस्तरीय तसेच प्रत्येक जिल्ह्यात देखरेख समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यशासनाच्या नगर विकास विभागाने १६ आॅगस्ट रोजी घेतला. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया विरूध्द पीपल फॉर इलिमेशन आॅफ ट्राय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाकडून शासनला आदेश देण्यात आले आहे. न्यायालयाने कुत्र्यांची वाढती संख्या, रेबीज निर्मूलन व मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर देखरेख ठेवण्याकरिता समित्या स्थापन करा, असे आदेशात नमूद आहे.

नगरविकास विभागाचे सचिव या समितीचे अध्यक्ष असून नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत. तर या समितीमध्ये पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य, ग्राम विकासचे प्रधान सचिव, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे प्रतिनिधी, राज्य अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक आदी दहा सदस्य आहेत. या समितीची बैठक ३ महिन्यातून एकदा घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

असे राहतील समित्यांचे कार्यस्थानिक पातळीवर प्राणी जन्म नियंत्रण समित्या, स्थापन करणे. व्यापक जिल्हानिहाय योजना विकसित करणे, स्थानिक/ जिल्हानिहाय योजना राबविण्याकरिता संस्थांची निवड करणे. जेथे उपरोक्त संस्था उपलब्ध नाही तेथे पशुसंवर्धन विभागाने विशेष वाहन उपलब्ध करणे. प्राण्यांच्या नसबंदीकरिता दर ठरविणे, त्यात दरवर्षी सुधारणा करणे.कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रासराज्यभर मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. राज्य पशुसंवर्धन आयुक्त व आरोग्य विभागाच्या यांच्या संयुक्त अहवालानुसार गत पाच वर्षात राज्यात ४५ हजार १७५ लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. तर २०१६ मध्ये जानेवारी ते जुलै या सात महिण्यात ५ हजार ६३ लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला.