शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेवाही ‘पीपीपी’ तत्त्वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 09:37 IST

राज्यात सद्यस्थितीत एकूण ५३ ठिकाणी डायलिसिस सेंटर कार्यरत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे राज्यातील शासकीय रुग्णालयांचे खासगीकरणाचा घाट घातला असताना याला कर्मचाऱ्यांच्या गटाकडून कडाडून विरोध होत आहे. अशा स्थितीत आता राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेवा पीपीपी तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. याकरिता, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असून याला मान्यता मिळाली आहे.

राज्यात सद्यस्थितीत एकूण ५३ ठिकाणी डायलिसिस सेंटर कार्यरत आहेत. या  केंद्रांव्यतिरिक्त राज्यात इतर शासकीय संस्थांमध्ये डायलिसिस सेवेची आवश्यकता लक्षात घेऊन  सद्यस्थितीत १००० खाटांची ५ उपजिल्हा रुग्णालये, ५० खाटांची १३ उपजिल्हा रुग्णालये आणि ३० खाटांचे एक ग्रामीण रुग्णालयामध्ये पीपीपी तत्त्वावर बाययंत्रणेद्वारे डायलिसिस सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. यात आवश्यकतेनुसार अन्य रुग्णालय व  नव्याने कार्यान्वित होणाऱ्या आरोग्य संस्थांचा समावेश प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या मान्यतेविषयी सोमवारी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जीआर काढला आहे.

काय आहेत निर्देश डायलिसिस सेवांच्या निविदा प्रक्रिया राबविताना तांत्रिक समितीद्वारे पडताळण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.  या प्रक्रियेत कोणत्याही विशिष्ट कंपनीला फायदा होणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या रुग्णांव्यतिरिक्त अन्य रुग्णांकडून एका डायलिसिस सत्राकरिता दोनशे रुपये आकारण्यात येतील, हे शुल्क रुग्ण कल्याण समितीमध्ये जमा करण्यात येतील.  या शुल्कामधून सेवा पुरवठादारास या लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी तेवढीच रक्कम अदा करण्यात येणार असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.