शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आता राखीव निकाल लावण्याचे आव्हान!, हजारो विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 05:20 IST

चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.

मुंबई : चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. विविध परीक्षेतील हे विद्यार्थी असून, त्यांच्याबरोबरच पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे आता हे निकाल लावण्याचे आव्हान आहे.विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली नाही. त्यातच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या मुदतीपूर्वी विद्यापीठ दोन्ही निकाल कसे लावणार आहे, याकडे विद्यार्थ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, अजून काही दिवस मुंबई विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारी खांद्यावरच राहणार असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे सध्या फक्त उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल यावर विद्यापीठाने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.विद्यापीठाने राखून ठेवलेल्या निकालांमध्ये काही विद्यार्थ्यांना हजर असून गैरहजर दाखवले होते, त्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तर उत्तरपत्रिकांच्या सरमिसळीचा प्रश्नही विद्यापीठाला पूर्णपणे सोडवण्यात यश आलेले नाही.>लवकरच निकाल जाहीर करणारमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले की, राखीव निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरच निकाल जाहीर करण्यात येतील. राखीव सर्व निकाल पदव्युत्तर प्रवेशाची मुदत संपण्यापूर्वी जाहीर व्हावेत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.