शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आता घरबसल्या चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र

By admin | Updated: May 13, 2016 03:57 IST

सरकारी व खासगीतील नोकरी,परदेशात जाण्यासाठी आवश्यक बनलेले चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईकरांना पोलिसांच्या विशेष शाखेत (एसबी-१) मध्ये घालावे लागणारे हेलपाटे

मुंबई : सरकारी व खासगीतील नोकरी,परदेशात जाण्यासाठी आवश्यक बनलेले चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईकरांना पोलिसांच्या विशेष शाखेत (एसबी-१) मध्ये घालावे लागणारे हेलपाटे आता कायमस्वरुपी बंद होणार आहेत. आता ते ‘आॅनलाईन’ घरबसल्या मिळविता येणार आहेत,तेही नोंदणी केल्यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसात. मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका तरुणाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ‘डिजिटल’स्वरुपात वितरित केले.चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी www.pcs. mahaonline.gov.in व www.aaplesarkar.mahaonline.gov.in   या संकेत स्थळावरुन एसबी-१च्या ग (जी) शाखेतर्गंत अर्ज करुन त्यासाठीचे शुल्क आॅनलाईन भरावे लागले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याकडून अहवाल आल्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या ईमेल आयडीवर प्रमाणपत्राची डिजीटल प्रत पाठविली जाईल. आठ ते दहा दिवसांत ही कार्यवाही केली जाईल, यासाठी यापूर्वीच्या पद्धतीनुसार ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागत होता, असे या शाखेचे प्रभारी अप्पर आयुक्त आर.डी.शिंदे यांनी सांगितले. आतापर्यत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई किंवा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करुन त्यांची प्रत विशेष शाखेच्या कार्यालयात सादर करावे लागत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या तारखेला पुन्हा कार्यालयात येऊन अर्ज व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागत होती. ही प्रक्रिया झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र नव्या प्रणालीनुसार आता नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला कार्यालयात जावे लागणार नाही. केवळ ते रहात असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जावे लागेल, त्याचप्रमाणे संबंधित ठाण्यातील पोलीस घराची शाहनिशा करण्यासाठी येतील. (प्रतिनिधी)> आॅनलाइन प्रमाणपत्र असे मिळणार अर्जदाराला पहिल्यादा वेबसाईटवर मोबाईल क्रमांक ,पासवर्ड वापरुन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करुन आॅनलाईन फार्म भरावा लागेल.मोबाईलवर आलेल्या तारखेला संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित रहावे लागेल, त्यांच्याकडून २/३ दिवसामध्ये पडताळणीचा अहवाल आॅनलाईन अपलोड केल्यावर ग शाखेच्या लॉगइनवर दिसेल. शाखेकडून पडताळणी करुन अर्जदाराचे प्रमाणपत्र डिजीटल सहीद्वारे तयार करुन त्याबाबत अर्जदाराला कळविला जाईल. त्यानंतर मेलवरुन त्याने डाऊनलोड करुन त्याची प्रत काढून घ्यावी लागेल. वर्षाला ८० हजार अर्जचारित्र्य पडताळणीसाठी दरवर्षी शहर व उपनगरातून सरासरी ८० हजार अर्ज विशेष शाखेत केले जातात. त्यासाठी नाममात्र शुल्क घेतले जाते. मात्र कार्यालयात ये-जा करण्याबद्दल किमान ४०० ते ५०० रुपये खर्च येतो, त्याशिवाय २,३ महिने प्रतिक्षा करावी लागत असे. आता आॅनलाईन प्रणालीमुळे नागरिकांचा हा त्रास कमी होणार असल्याचे उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.