मुंबई- ठाणे येथे कर्करोग इस्पितळ उभारण्याकरिता टाटा मेमोरियल हॉस्पिटलला एक महिन्यात जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. याखेरीज वांद्रे-कुर्ला संकुलात ग्लोबल फायनान्शियल सेंटर उभे करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी वेगवेगळ्या महानगरांतील नागरी सुविधांच्या अभावासंबंधी दाखल केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. (विशेष प्रतिनिधी)
आता ठाण्यातही कर्करोग इस्पितळ
By admin | Updated: April 11, 2015 03:55 IST