शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘बिल्ड इन मुंबई’!

By admin | Updated: February 16, 2016 03:38 IST

बईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. परवडणारी घरे जर बांधली गेली, तर सर्वसामान्यांना या शहरात राहणे सोईचे होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळेल, त्यासाठी आता ‘बिल्ड इन मुंबई’ची घोषणा करत,

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. परवडणारी घरे जर बांधली गेली, तर सर्वसामान्यांना या शहरात राहणे सोईचे होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळेल, त्यासाठी आता ‘बिल्ड इन मुंबई’ची घोषणा करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. ‘मेक इन मुंबई’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापालिकेने बांधकामांचे परवाने ३६५ दिवसावरून १९० दिवसांवर आणले आहेत. आता ते ६० दिवसांवर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसआरए, म्हाडा, क्रेडाई अशा प्रत्येकांनी परवडणारी घरे बांधण्यात पुढाकार घेतला पाहिजे. नवी मुंबईतल्या बिल्डरांचेही शिष्टमंडळ आपल्याला भेटले असून, तेही मोठ्या प्रमाणावर घरे बांधून देण्यास तयार आहेत. घरे तयार झाली, तर त्याचा फायदा आम मुंबईकर माणसाला म्हणजेच, मराठी माणसाला होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठी मतांची काळजी केवळ शिवसेनेला नाही, तर भाजपाला आहे, हेही स्पष्ट केले.मुंबई : मुंबईचा विकास झालाच पाहिजे. सिडकोत आणखी एक मुंबई उभी राहिली, तरीही या शहराचे महत्त्व कमी होणार नाही. या मुंबईचा विकास झालाच पाहिजे, पण मोकळा श्वास घेण्यासाठी थोडी तरी मोकळी जागा द्या, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंख्यमंत्र्यांच्या ‘बिल्ड इन मुंबई’ ला योजनेला खो दिला.मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने ‘मेक इन इंडिया’चा हा डोलारा उभा केला आहे, तो सगळा पेलवणं कठीण काम होते. मात्र, हे असे काम करण्यासाठी जिद्द असावी लागते, जी मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत आणि हा पहिलाच कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात होत असल्याचेही ठाकरे म्हणाले.माझ्या स्वप्नांचा सामंजस्य करार‘मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केले आहेत. मात्र, मीदेखील त्यांच्याशी एक सामंजस्य करार केला आहे. मी दिवसा, झोपेत स्वप्न पहातो. महाराष्ट्राच्या, मुंबईच्या विकासाची आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी सामंजस्य करार केला आहे. आता माझी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले,’ त्यावर फडणवीस यांनीही हसून दाद दिली.थोडी मोकळी जागा सोडा - उद्धव ठाकरेमुंबईला मदत करण्यासाठी सगळे तयार आहेत. ट्रान्स हार्बर लिंक अस्तित्वात येण्याचा मार्ग खुला झाला आहे. ८ हजार कोटींचा हा प्रकल्प १८ हजार कोटींवर गेला आहे, पण यासाठी ४० वर्षांच्या बोलीवर अवघ्या १ ते २ टक्के दराने ‘जायका’ कर्ज देण्यास तयार आहे. त्यांना स्वच्छ प्रस्ताव हवे आहेत. या आधी काय झाले, त्यात आपणाला जायचे नाही, पण आता यापुढे पारदर्शक प्रस्ताव तयार केले जातील आणि त्यातून गुंतवणूकदारांना विश्वास दिला जाईल. - देवेंद्र फडणवीस‘मेक इन मुंबई’ वरील परिसंवादाचा समारोप ठाकरेंच्या हस्ते झाला. मुंबईची लोकसंख्या कशी वाढते हा काळजीचा विषय आहे. मूळच्या मुंबईकरांचा सन्मान ठेवून ही मुंबई वाढायला हवी. खरी मुंबई गिरणी कामगारांची होती. नंतर त्यांची काय अवस्था झाली हे देशाने पाहिले. आता तुम्ही वस्त्रोद्योग धोरण आणणार आहात. महाराष्ट्राचा विकास झाला, तर देशाचा विकास होईल, पण त्यासाठी मुंबईचा विकास झाला पाहिजे. - उद्धव ठाकरे